Dhananjay Munde saam tv
महाराष्ट्र

Dhananjay Munde : मराठवाड्यातील सर्व निवडणुका 'मविआ'च जिंकणार; दळभद्री भाजपच्या हाती.., धनंजय मुंडेंची जहरी टीका

निवडणुकांमध्ये दळभद्री भाजप सरकारच्या हाती काहीच मिळणार नाही, अशी जहरी टीका देखील मुंडे यांनी भाजपवर केली आहे.

विनोद जिरे

Dhananjay Munde News : येणाऱ्या काळात मराठवाड्यातील सर्व निवडणूका महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे आमदार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. या निवडणुकांमध्ये दळभद्री भाजप सरकारच्या हाती काहीच मिळणार नाही, अशी जहरी टीका देखील मुंडे यांनी भाजपवर केली आहे. ते परळीत बोलत होते.  (Maharashtra Political News)

राज्यात मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहे. दरम्यान, याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदधवीधर उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ, बीडच्या परळी येथे मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला धनंजय मुंडे यांनी ऑनलाईन संबोधित करत, भाजपवर टीका केली आहे. (Latest Marathi News)

यावेळी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) म्हणाले, की आपल्या सर्वांच्या कृपेने मी अपघातातून बचावलो आहे. अशा पद्धतीने बेड वरून आपल्या सर्वांशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधेल असे मी स्वप्नात ही पाहिले नाही. अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

ते पुढे बोलतांना म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने एक उचल्या उमेदवार उचलून आणला आहे, हे फार दुर्दैव आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला 7 पिढ्या जरी गेल्या तरी विक्रम काळे यांच्या सारखा उमेदवार मिळणार नाही.

येणाऱ्या काळातील मराठवाड्यातील सर्व निवडणूक ही महाविकास आघाडी जिंकणार अन या दळभद्री भाजप सरकारला हाती काहीच मिळणार नाही. असं मोठं विधान करत धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला. दरम्यान विक्रम काळे यांना चौथ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजय मिळणार आहे. असा विश्वासही धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

Shukra Gochar 2024: नोव्हेंबर अखेरीस शुक्राचं नक्षत्र गोचर वाढवणार डोकेदुखी; आर्थिक हानी होण्याचा धोका

SCROLL FOR NEXT