Amol Mitkari Sting Operation Saam Tv
महाराष्ट्र

Akola News: अमोल मिटकरींनी केलं स्टिंग ऑपरेशन, व्हिडीओद्वारे दाखवलं अकोल्यातील बेघर निवारा केंद्रांतील बेघरांचे हाल

Amol Mitkari Sting Operation: अकोल्यातल्या मातानगरात बच्चू कडूंच्या संकल्पनेतून संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र उभारण्यात आलं आहे. याठिकाणी अमोल मिटकरींनी स्टिंग ऑपरेशन केलं. याठिकाणी राहणाऱ्या बेघरांचे हाल त्यांनी सर्वांसमोर आणले आहे.

Priya More

अक्षय गवळी, अकोला

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी अकोल्यात रात्री एक 'स्टिंग ऑपरेशन' केले. अकोल्यातल्या मातानगरात तत्कालिन पालकमंत्री बच्चू कडूंच्या संकल्पनेतून संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्र उभारण्यात आलं आहे. या ठिकाणी भिकारी आणि घर नसलेल्या अनाथ नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार मिटकरींच्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये या केंद्रातील अनेक अनियमितता समोर आल्या आहेत.

अकोला महापालिकेच्या ताब्यात असलेल्या या केंद्रासाठी तेंव्हा ४.५० कोटींचा निधी शासनाकडून देण्यात आला होता. भिकारी तसंच रहायला घर नसलेले गरीब बेघरांना हा हक्काचा निवारा मिळाला आहे. मात्र, आमदार मिटकरींनी अकोल्यातील याच 'संत गाडगेबाबा बेघर निवारा केंद्रातील अव्यवस्था एका 'स्टिंग ऑपरेशन'मधून समोर आणली आहे. आमदार अमोल मिटकरींनी बेघर निवारा केंद्राला आकस्मिक भेट दिली. रात्री उशिरा अमोल मिटकरी थेट बेघर निवारा केंद्रावर दुचाकीने पोहोचले. आपल्या आजीला भेटायचे सांगत त्यांनी या केंद्रात प्रवेश केला.

यावेळी या बेघर निवारण केंद्रात मोठा घोळ असल्याचं त्यांच्या पाहणीत दिसून आलं. बेघर निवारा केंद्रातल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना येथे मूलभूत सुविधा नसल्याचे मिटकरींच्या पाहणीतून समोर आलं. अनेकांना वेळेवर औषधांचा पुरवठा होत नाहीये, जेवण्याची पाहिजे तशी व्यवस्था येथे नाही. महिन्याकाठी येथल्या नागरिकांना मिळणारं २ हजार रुपयांचं मानधन देखील त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, अशा तक्रारी येथील नागरिकांनी आमदार मिटकरींसमोर मांडल्या.

या बेघर निवारा केंद्रात दररोज जेवण देखील उपलब्ध होत नाही. बाहेरून अन्नदान करणाऱ्या लोकांकडून इथे जेवणाचा पुरवठा होत आहे, मात्र शासनाकडून मिळणाऱ्या सुविधा इथल्या नागरिकांना मिळत नाहीत, असा थेट आरोप आमदार मिटकरींनी साम टीव्हीशी बोलताना केला. अमोल मिटकरींनी येथील व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मिटकरींच्या या अचानक भेटीमुळे बेघर निवारा केंद्राच्या संचालकांची चांगलीच धावपळ उडालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MS Dhoni : एमएस धोनी किती कोटींचा मालक?

Shubman Gill : इंग्लंडमध्ये १ कसोटी सामना जिंकला, कॅप्टन गिल थेट रिटायरमेंटबद्दल बोलला

Pro Govinda Season: आजपासून ३ दिवस रंगणार प्रो गोविंदा सीझन ३ चा अंतिम सामना; १६ गोविंदा पथकं एकमेकांसमोर उभी ठाकणार

Maharashtra Nurses Strike : आरोग्य यंत्रणा ठप्प होणार? नर्सचा संपाचा इशारा | VIDEO

Ambarnath : भरधाव स्कुल व्हॅनमधून विद्यार्थी पडले खाली; अंबरनाथमधील धक्कादायक घटना, घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT