Amol Kolhe Viral Post Saamtv
महाराष्ट्र

Amol Kolhe News: 'राष्ट्रवादीतून भाजपमध्ये...' फोटो शेअर करत अमोल कोल्हेंनी दिले स्पष्ट संकेत? पोस्ट व्हायरल

Amol Kolhe News: अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीतून भाजपकडे प्रवासाचे स्पष्ट संकेत दिले आहेत का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

Prachee kulkarni

Amol Kolhe Post On World Book Day: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ) शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज असून येत्या काळात ते मोठा निर्णय घेऊ शकतात, असे बोलले जात आहे. याबद्दल अमोल कोल्हेंनी अद्याप कोणतीही ठोस भूमिका जाहीर केली नाही. मात्र त्यांच्या एका पोस्टमुळे पुन्हा एकदा ते भाजपच्या वाटेवर आहेत का? अशी चर्चा रंगू लागली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, 23 एप्रिल हा दिवस रोजी संपूर्ण जगभरात 'जागतिक पुस्तक दिन' साजरा केला जातो. याच निमित्ताने खासदार अमोल कोल्हेंच्या एका पोस्टमुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा पुन्हा एकदा रंगू लागल्या आहेत.

काय आहे अमोल कोल्हेंची पोस्ट...

जागतिक पुस्तक दिनानिमित्त अमोल कोल्हे यांनी ट्विटरवर ही पोस्ट केली आहे. ज्यामध्ये पहिल्या फोटोत त्यांच्या हातात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भाषण संग्रहाचे पुस्तक नेमकाची बोलणे हे पुस्तक दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत द न्यू बीजेपी नावाचे नलिन मेहता यांचे पुस्तक वाचत असल्याचे दिसत आहे.

हे दोन फोटो पोस्ट करत अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीतून (NCP) भाजपकडे प्रवासाचे स्पष्ट संकेत दिले आहेत का? अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. "विचारधारा कोणतीही असो, ती समजून घेण्यासाठी पुस्तकांसारखा चांगला गुरू कोण?" असा कॅप्शनही अमोल कोल्हे यांनी या पोस्टला दिला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अमोल कोल्हे लवकरच शिक्का मोर्तब करणार का? असाही सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अमोल कोल्हे यांनी 2024 ला मी शरद पवार यांच्यासोबतच असणार आहे, अशी प्रतिक्रिया दिली होती. माझ्या विषयीच्या बातम्या पेरल्या जात आहेत. हीच माझ्या कामाची पोचपावती आहे. माझ्या मतदारसंघात सगळ्यात जास्त कामे झाली आहेत, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. (Maharashtra Politics)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

SCROLL FOR NEXT