Shivsena/ NCP Saam TV
महाराष्ट्र

आमदारांच्या जाचामुळे राष्ट्रवादी सोडतोय, NCP कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

'पक्ष स्थापनेपासून आम्ही राष्ट्रवादीत होतो, मात्र आता आमदारांच्या जाचामुळे आम्हाला शिवसेनेत जावे लागत आहे.'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बीड : माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातील (Beed District) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कार्यकर्ते फोडायला सुरुवात केली असून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीच्या फारूक पटेल, अमर नाईकवाडे, बाबूशेठ लोढा, नितीन लोढा, गंगाधर घुमरे या कार्यकर्त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी ते आज शिवसेनेत (Shivena) प्रवेश करणार आहेत. जयदत्त क्षीरसागर (Former MLA Jaydatta Kshirsagar) यांचे पुतने संदीप क्षीरसागर यांनी मागील विधानसभा निवडुकीध्ये राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवत जयदत्त क्षीरसागर यांच्याविरोधात निवडणूक लढवून त्यांचा पराभव केला होता.

कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी सोडताना आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदारांची सध्याची कार्यपद्धत वेगळी आहे, ते विकास कामं करण्याऐवजी आलेली कामं अडवतात. पालकमंत्र्यांनी तालुक्यात आणलेल्या विकास कामांचे श्रेय घेतात असे आऱोप कार्यकर्त्यांनी केले आहेत.

ते म्हणाले, आम्ही पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादीत होतो, मात्र आता आमदारांच्या जाचामुळे आम्हाला शिवसेनेत जावे लागत आहे. पोटाला दगड बांधून संदीप यांना निवडून आणलं होतं. मात्र सध्याचे आमदार हे निष्क्रिय निघाले त्यामुळे आता आम्ही शिवसेनेते प्रवेश करत असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. जयदत्त क्षीरसागर यांच्या नेत्वृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: पुण्यातल्या ४ मतदारसंघात भाजप आघाडीवर

Assembly Election Results 2024 : देशमुखांच्या बालेकिल्ल्यात अमित देशमुखांची 10 हजार मतांनी पिछाडी, पाहा Video

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

SCROLL FOR NEXT