रश्मी पुराणिक -
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध केला आहे. ते साम टिव्हीशी बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्यीतील ३०० आमदारांसाठी मुंबईत घरे बांधणार असल्याची घोषणा केली आणि त्यावरुन संपुर्ण राज्यभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या अनेक नागरिकांनी या निर्णयाचा निषेध केला तर अनेक आमदारांनी देखील आम्हाला ही घरं नकोत अशी भूमिका घेतली तर काहींनी या निर्णयाचं स्वागत केलं होतं.
दरम्यान, आमदारांना घरं हवीतच कशाला? त्यापेक्षा शेतकऱ्यांना वीज मोफत द्या, असा सूर काही आमदारांनी लावल्याने राज्य सरकारला घरांबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी लागली होती. आमदारांना देण्यात येणारी घरं मोफत देण्यात येणार नसल्याचं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्पष्ट केलं, तसंत या घरांसाठी आमदारांकडून घराची किंमत वसूल केली जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आमदारांना घरं देण्याचा निर्णयाचा विरोध केला आहे.
त्यांनी साम टीव्हीशी बोलताना सांगितलं की, फक्त आमदारासाठी घर देण्याच्या निर्णयाला विरोध आहे. मात्र, गृहनिर्माण योजनेमधील घरांमध्ये आमदारांसाठी कोटा ठेवावा, हे योग्य आहे. ते ही त्या घरांची योग्य किंमत घेऊन घर दिली पाहिजे याबाबत ते पक्षातील मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचंही म्हणाले.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.