Rajesh Tope Saam Tv
महाराष्ट्र

Rajesh Tope : जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का; राजेश टोपे यांच्या समर्थ ग्रामविकास पॅनलला मोठा दणका

ग्रामपंचायत निवडणुकीत राजेश टोपे यांना मोठा धक्का बसला आहे.

लक्ष्मण सोळुंके

Gram Panchayat Election Result 2022 : राज्यातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकांचा (Gram Panchayat) निकाल आज जाहीर होत आहे. राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीत राजेश टोपे यांना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत राजेश टोपे यांच्या समर्थ ग्रामविकास पॅनलला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. (Latest Marathi News)

माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या समर्थ ग्रामविकास पॅनलचा मोठा पराभव झाला आहे. तर सतिश घाडगे पाटील यांच्या समृद्धी ग्रामविकास पॅनलने माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्या पाथरवाला गावात दणदणीत विजय मिळवला आहे.

समृद्धी विकास परिवर्तन पॅनल सुमनबाई विठ्ठलराव सुडके यांच्याकडून राष्ट्रवादीचं समर्थ ग्रामविकास पॅनलच्या अनिता गंगाधर मरकड यांचा पराभव केला आहे. या पराभवामुळे राजेश टोपे यांना मोठा धक्का बसला आहे. या ग्रामपंचायतील ७ पैकी ५ जागांसह सरपंच घाडगे पाटील यांच्या समृद्धी विकास परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला आहे. समर्थ ग्रामविकास पॅनलच्या पराभवामुळे हा राजेश टोपे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

रावसाहेब दानवेंच्या गावात भाजपचा दणदणीत विजय

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जवखेडा खुर्द गावात ३० वर्षानंतर निवडणूक झाली. या निवडणूकीत (Election News) दानवेंचे वर्चस्व कायम ठेवण्यात त्यांच्या भावजाई सुमन मधुकर दानवे यांना यश आले. यामुळे तीस वर्षांपासून सत्‍ता कायम राहिली आहे.

जवखेडा खु. गावात लागलेल्‍या निवडणूकीमुळे मागील तीस वर्षानंतर गावात मतदान झाले. यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची प्रतिष्‍ठा पनाला लागली होती. त्‍यांच्‍या भावजाई सुमन दानवे यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) सुनिता संतोष दानवे यांचा दणाणून पराभव करत पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर भाजपचा (BJP) झेंडा फडकवत 30 वर्षाची परंपरा कायम ठेवत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रतिष्ठा कायम ठेवली आहे.

जालना जिल्ह्यातील 250 ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

जिल्ह्यातील 150 ग्रामपंचायतींपैकी 130 ग्रामपंचायतींवर भाजपचा वरचष्मा

पक्ष आणि मिळालेल्या ग्रामपंचायती

भाजप=130

राष्ट्रवादी=56

शिंदे गट =06

ठाकरे गट=14

काँग्रेस=10

इतर=34

एकूण 250

बिनविरोध =16

सर्व एकूण =266

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT