Ekanath khadse and Pankaja Munde
Ekanath khadse and Pankaja Munde  Saam Tv
महाराष्ट्र

भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी डावलली; एकनाथ खडसे म्हणाले...

प्रदीप भणगे

डोंबिवली : विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. या उमेदवारींच्या यादीत पंकजा मुंडे यांना भाजपकडून डावलण्यात आले आहे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेची उमेदवारी डावलल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठी भाजपकडून डावलण्यात आलं याचं मला दु:ख आहे', अशा शब्दात एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ खडसे हे डोंबिवली येथे नातेवाईकांच्या घरी भेटण्यासाठी आले होते. (Maharashtra Politics News In Marathi )

एकनाथ खडसे म्हणाले, 'पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना डावलले याचं मला दुःख आहे. मुंडे-महाजन-खडसे या नावाने काही कालखंड भाजपाची ओळख होती. वर्षानुवर्ष अनेकांनी त्यात योगदान दिलं. अनेकाच्या मदतीने पक्षाचा विस्तार झाला. मुंडे साहेब आमचे नेते होते. त्यांनी यासाठी उभे आयुष्य खर्ची घातलं, त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला प्रामुख्याने पंकजाताई सारख्या ओबीसी नेतृत्वाचा परिचय सर्व महाराष्ट्राला आहे. तिला मानणारा वर्ग मोठा आहे. अशा स्थितीत तिला डावलण्याचं काय कारण आहे हे मी समजू शकलेलं नाही, अशी खंत एकनाथ खडसेंनी व्यक्त केली.

राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर आता अपक्ष आमदारांवर विविध आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले, 'मतदारावर विश्वास दाखवावा लागतो. मत दिलं की नाही दिलं हा अंदाज असू शकतो, मात्र निश्चित स्वरूपात सांगणे योग्य होत नाही, आमदारांवर जी जबाबदारी सोपवली आहे, त्यांनी निश्चितपणे पार पाडलेली दिसत आहे. मी प्रतोद अनिल पाटील त्यांच्याशी चर्चा केली, ते प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थित होते. यांनी मला सांगितलं तिघांनी मतदान केलय याची मला खात्री आहे'. एकनाथ खडसेंनी अपक्षांवर अशा प्रकारे अविश्वास दाखवणे योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT