Sharad Pawar Speech saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Speech: पक्ष चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही; शरद पवारांनी ठणकावून सांगितलं

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार गटाकडून पक्ष आणि चिन्ह आपलाच असल्याचा दावा सात्तत्याने केला जात आहे. छगन भुजबळ यांनी देखील आजच्या भाषणात पक्ष आणि चिन्ह आपलाच आहे, कायद्याचा संपूर्ण अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतला असे सांगितले. यानंतर वायबी चव्हान सेंट्र येथे बोलताना शरद पवार यांनी पक्ष चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला आहे. (Latest Marathi News)

आपलं नाणं चालणार नाही याची त्यांना कल्पना

राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या आमदारांविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, त्यांना माहिती आहे आपलं नाणं चालणार नाही. त्यांचं नाणं खरं नाहीये, म्हणून त्यांनी माझा फोटो वापरला. एकीकडे पांडुरंग म्हणायचं, गुरू म्हणायचं, आणखी काय काय म्हणायचं आणि दुसरीकडे आमच्याकडे दुर्लक्षे केलं म्हणायचं असं नसतं, असे देखील पवार म्हणाले. (Maharashtra Politics)

"भाजपचं हिंदुत्तव विषारी, विघातक, मनुवादी"

शरद पवार म्हणाले, शिवसेनेसोबत गेलो म्हणून प्रश्न उपस्थित केला गेला. तुम्ही शिवसेनेबरोबर गेले म्हणून आम्ही भाजपसोबत गेलो असे सांगितले जाते. शिवसेना हिंदुत्ववादी आहे हे खरं आहे, त्यांनी ते लपवून ठेवलेलं नाही. पण शिवसेनेचं हिदुत्व हे सर्व जातीच्या लोकांना सोबत घेऊन जाणारं हिंदुत्व आहे. भाजपचं हिंदुत्व हे विषारी, विघातक, मनुवादी, माणसामाणसांत फूट पाडणारं आहे, अशा शब्दांत शरद पवार यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. (Latest Political News)

पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली - पवार

कार्यकर्त्यांना नव्यानं उभारी घेण्यासाठी प्रोत्साहन देताना शरद पवार म्हणाले, याआधी जे सोडून गेले ते पडले. त्यानंतर नवीन तरुण चेहरे आले. आज जे गेले त्यांना जाऊद्या, सुखाने राहू द्या. आपण एकत्र आहोत तोपर्यंत नवीन कर्तुत्व सहकारी टीम टायर करू. उशकाल होता होता काल रात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असे म्हणत पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

SCROLL FOR NEXT