Sharad Pawar News 
महाराष्ट्र

Sharad Pawar News: प्रचंड गर्दीतून घोषणाबाजी, शरद पवारांनी 'त्या' कार्यकर्त्याला नावासह ओळखलं; पाहा VIDEO

Sharad Pawar: शरद पवार यांच्या अफाट स्मरणशक्तीचा आणि लोकसंग्रहाचा प्रत्यय पुण्यातील एका कार्यक्रमात आला. या प्रसंगाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केला आहे.

Gangappa Pujari

Rohit Pawar News:

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे त्यांचा दांडगा जनसंपर्क, तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि अफाट स्मरणशक्ती असलेले नेते म्हणून ओळखले जातात. गेली अनेक दशके शरद पवार हे राज्याचे तसेच दिल्लीचे राजकारण गाजवताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या अफाट स्मरणशक्तीचा आणि लोकसंग्रहाचा प्रत्यय पुण्यातील एका कार्यक्रमात आला. या प्रसंगाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केला आहे.

नेमकं काय घडलं?

(१३, जानेवारी) जुन्नरमध्ये शरद पवारांच्या हस्ते विघ्नहर साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पाची विस्तारीकरण लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, स्थानिक आमदार अतुल बेनके, सत्यशिल शेरकर आदी नेते उपस्थित होते. या लोकार्पण सोहळ्यानंतर शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.

शरद पवार (Sharad Pawar) हे बोलायला उभे राहताच समोर बसलेल्या गर्दीतून एका कार्यकर्त्याने शरद पवारांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. आश्चर्य म्हणजे शरद पवार यांनी कार्यकर्त्याकडे न पाहता फक्त आवाजावरुन कोंडाजी वाघ आहेत ना? असा सवाल विचारला. उपस्थितांनीही होकारार्थी मान हलवली अन् साहेबांची स्मरणशक्ती पाहून सर्वचण अचंबित झाले.

काय म्हणालेत रोहित पवार?

शरद पवार यांच्या या कृतीने आमदार रोहित पवार (Rohit Pawar) चांगलेच भारावुन गेले आहेत. या प्रसंगाचा व्हिडिओ त्यांनी एक्स माध्यमावर शेअर केला आहे. तसेच या ट्वीटसोबत आदरणीय साहेब तुमच्या लोकसंग्रहाला आणि स्मरणशक्तीला सलाम, असा खास कॅप्शनही रोहित पवार यांनी दिला आहे. त्यांचे हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे. (latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

ठाणे हादरलं! गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला संपवलं, नंतर मृतदेह हिरव्या ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला

CNG, पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकल्या, घरगुती गॅस सिलिंडरचे दरही वाढणार?

Vidyadhar Joshi: 'सोनं खरेदी करणं म्हणजेच विनोद'; मोदींच्या आवाहनावर प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची मार्मिक पोस्ट

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

SCROLL FOR NEXT