kirit somaiya saam tv
महाराष्ट्र

Ratnagiri: सोमय्यांचा शनिवारी दापोली दाैरा; राष्ट्रवादीसह सेनेनं दिला इशारा

शिवसेना- राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

अमोल कलये

रत्नागिरी : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) येत्या शनिवारी (ता. २६ मार्च) दापोली (dapoli) दौऱ्यावर येत आहेत. अनिल परब (anil parab) यांचे दापोली तालुक्यातील मुरूड (murud) येथील रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप करत हे अवैध रिसॉर्ट तोडूया असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे (ncp) माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे (shivsena) प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांनी सोमय्या यांना दापोलीतच रोखुन धरणार असल्याचा इशारा दिला आहे. (kirit somaiya latest marathi news)

किरीट सोमय्या यांनी मिलींद नार्वेकर (milind narvekar) यांचा बंगला ताेडला आता अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया असा इशारा देत चलो दापोली असे ट्विट केले आहे. किरीट सोमय्या यांच्यामुळे कोकणातील दापोली मुरूड येथील पर्यटन उद्योजकांना नोटिसा आल्या आहेत. जर कोकणातील पर्यटन उद्योगाच्या आड कोण येणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा संजय कदम यांनी सोमय्या यांच्या दाै-यावरुन दिला आहे.

राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम व शिवसेनेचे प्रभारी तालुकाप्रमुख ऋषी गुजर यांच्या इशा-यामुळे साेमय्यांच्या शनिवारी होणाऱ्या दापोली दौऱ्या दरम्यान शिवसेना- राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

Accident: लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १०० जणांना घेऊन जाणाऱ्या ट्रकला कंटेनरची धडक; ४ जणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? ठाकरेंचे ६ खासदार फुटणार? हिंगोलीतील खासदार एकनाथ शिंदेंच्या भेटीला

SCROLL FOR NEXT