Amol Kolhe SaamTV
महाराष्ट्र

Amol Kolhe News : ‘मी पुन्हा येईन सांगायला आता भीती वाटते’, राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीनंतर अमोल कोल्हेंचं वक्तव्य

Political News : अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला.

साम टिव्ही ब्युरो

Amol Kolhe News : शिरुर लोकसभेच्या जागेवरुन राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असताना राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आपल्या कामाचा लेखाजोखा मांडला.

अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, ‘मी ज्यावेळी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यावेळी बैलगाडा शर्यत सुरु करणे, पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवणे आणि पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. चार वर्षात बैलगाडा शर्यत आणि पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी हे प्रश्न पूर्णपणे सुटले आहेत.’ (Latest Marathi News)

तर पुणे-नाशिक रेल्वेचा प्रश्न आजवर आश्वासनांमध्ये होता, तो भूसंपादन ते कॅबिनेट मान्यतेपर्यंत पोहोचला आहे. हा संपूर्ण आढावा शरद पवार साहेबांसमोर मांडला. यापुढील काळातही जोमाने काम करण्याच्या सूचना पवार साहेबांनी दिल्या आहेत, असं अमोल कोल्हेंनी सांगितलं.

लोकसभा उमेदवारीबाबत आता अंतिम निर्णय पक्ष घेईल. तसेच साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असा पुनरुच्चारही अमोल कोल्हे यांनी केला. (Maharashtra Political News)

पुन्हा येईल याची भीती वाटते

राजकारण बाजूला ठेवून कलाकार म्हणून अनेक राजकीय मंडळीशी भेट होत असते. त्यामुळे याबाबत कुणीही अकारण चर्चा करु नये. मी पुन्हा येईल म्हणायला आता भीती वाटते. त्यामुळे पवार साहेब सांगतील तो आदेश मान्य असेल, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.

अजित पवार म्हणाले...

अमोल कोल्हे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाबाबत आम्ही सर्व नेते बैठक घेऊन योग्य मार्ग काढू. तुम्ही काळजी करु नका, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care : केसांना गरम तेल लावल्याने काय होते? जाणून घ्या योग्य पध्दत

Face Care: चेहरा नॅचरल ग्लोईंग आणि सॉफ्ट पाहिजे? फक्त आठवड्यातून २ वेळा 'ही' घरच्या घरी तयार होणारी पेस्ट नक्की

Maharashtra Live News Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

Breast Cancer: भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा वाढता धोका; २०५० पर्यंत परिस्थिती गंभीर होणार, लॅन्सेटचा इशारा

Nashik : नाशिकमध्ये सव्वा कोटींची लाच मागणाऱ्या जीएसटी अधिकाऱ्यांच बिंग फुटलं, २० लाख घेताना रंगे हाथ पकडलं

SCROLL FOR NEXT