Mahayuti  Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: वादग्रस्त विधानांवरुन 'महायुती'त ठिणगी; अजित पवार गट करणार दिल्ली हायकमांडकडे तक्रार?

Mahayuti Crisis NCP Ajit Pawar Group VS BJP News: राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली असून भाजपाच्या वादग्रस्त, तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची दिल्लीत तक्रार केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Gangappa Pujari

सुनिल काळे, मुंबई|ता. १९ सप्टेंबर

Maharashtra Assembly Election 2024: एकीकडे विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असतानाच महायुतीमधील संघर्ष शिगेला पोहोचल्याची चिन्हे दिसत आहेत. महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून राष्ट्रवादी अजित पवार गटावर वारंवार निशाणा साधला जात आहे. दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांकडून वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. याबाबत आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली असून भाजपाच्या वादग्रस्त, तसेच धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची दिल्लीत तक्रार केली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बेताल वक्तव्याने दादा गट नाराज!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांनी राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. हिंदु-मुस्लिम समुदायाबद्दल केलेली धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याने महायुतीचे नेते चर्चेत आले होते. या वादग्रस्त विधाने करणाऱ्या नेत्यांमध्ये शिवसेना शिंदे गटातील संजय गायकवाड, संजय शिरसाट तसेच भारतीय जनता पक्षातील आमदार नितेश राणे, खासदार अनिल बोंडे हे नेते आघाडीवर आहेत.

दिल्ली हायकमांडकडे करणार तक्रार...

महायुतीच्या नेत्यांनी केलेल्या या बेताल वक्तव्यामुळे विरोधकांना आयते कोलित मिळत असून नागरिकही संताप व्यक्त करत आहेत. यावरुनच राष्ट्रवादी अजित पवार गटाने आता आक्रमक भूमिका घेतल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदे गट तसेच भाजपाच्या वादग्रस्त आणि धार्मिक तेढ वक्तव्य करणाऱ्या नेत्यांची अजित पवार गट थेट दिल्ली हायकमांडकडे तक्रार करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

नितेश राणेंसह काही नेते मुद्दाम मुस्लिम धर्माविषयी वाद निर्माण होणारे वक्तव्य वारंवार करतात यावरून अजित दादा गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी असून प्रफुल पटेल, सुनिल तटकरे थेट दिल्लीत नेत्यांसोबत याबाबत बोलणार असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अजित पवार गटाच्या या भूमिकेमुळे महायुतीमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Maharashtra News Live Update: गर्भलिंग निदान प्रकरणात किकवीच्या डॉ. मंदार माळी यांच्यावर गुन्हा दाखल

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतून 73 लाख महिला अपात्र; किती महिला कुठल्या कारणामुळे वगळल्या गेल्या?

Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT