dr. afsar shaikh
dr. afsar shaikh 
महाराष्ट्र

...तर लॉजमध्ये घुसुन मारू : नगराध्यक्ष डॉ अफसर शेख

दीपक क्षीरसागर

लॉज मालकांना नोटिसा दिल्या असून त्यांचे बांधकाम आणि व्यवसाय परवाना वैध नसल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकारी वसुधा फड यांनी सांगितले.

लातुर : जिल्ह्यातील औसा शहरातील अनेक लॉजवर बेकायदेशीर धंदे सुरु आहेत. या धंद्यामुळे शहराची शांतता भंग पावत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असताना पोलिस यंत्रणा हे धंदे बंद करण्यास अपयशी ठरत असल्याने नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी आता याची तक्रार थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडेच केली आहे. ncp-afsar-shaikh-complaints-on-police-to-dilip-walse-patil-sml80

औसा शहरात विविध ठिकाणी आठ ते दहा लॉज आहेत. यामधील बहुतांश लॉजवर अवैध धंदे सुरु असल्याचा आरोप नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी केला आहे. भरवस्तीमधील काही लॉजमध्ये देहविक्री केली जाते असे डाॅ. शेख यांनी नमूद केले. ते म्हणाले औसा ही संतांची, सुफींची भुमी असुन या भूमीस ऐतिहासीक वारसा आहे. नाथपिठ, केशव बालाजी मंदीर, भुईकोट किल्ला, विविध शैक्षणीक संस्था असल्याने लॉजवर चाललेल्या या बेकायदेशीर धंद्यांचा परिणाम शहराचे पावित्र्य व शांतता भंग करणारी आहे.

काही लॉज चालक हे जोडप्यांना रुम भाड्याने देत असल्याने औशात परजिल्ह्यातून जोडपे येत आहेत. तरुण मुलांच्या व शाळकरी मुलांच्या समोर हे धंदे सुरु असल्याने त्याचा अनिष्ठ परिणाम येथील युवा पिढीवर होत आहे. हे सर्व होत असताना शहरातील पोलिस मात्र बघ्याची भुमिका घेत असल्याने हे धंदे फोफावत समाजात वेगळा संदेश जात आहे.

हा प्रकार थांबविण्यासाठी आता पालिकेकडून संबंधीत लॉज चालकांना नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देखील तक्रार करण्यात आली आहे. या कामास अभय देणाऱ्यां विरोधात कारवाईची मागणी केल्याचे डाॅ. शेख यांनी सांगितले. येत्या आठ दिवसात शहरातील व परिसरातील लॉज चालकांनी बेकायदेशीर धंदे बंद केले नाही तर त्यांना रंगेहात पकडून लॉजमध्ये घुसुन मारू असा इशारा देण्यात आला आहे.

याबराेबरच राष्ट्रवादी काँग्रेस गैरकृत्य करणा-यांचा बंदोबस्त करेल. शहराच्या पावित्र्यास आणि शांततेस कोणी बाधा आणत असेल तर राष्ट्रवादी देखील हे कधीही खपवून घेणार नसल्याचा इशाराही नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांनी दिला.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CSK Vs SRH : ऋतराज गायकवाडची तुफानी फटकेबाजी, शतक अवघ्या २ धावांनी हुकलं; हैदराबादसमोर २१३ धावांचं लक्ष्य

Maharashtra Politics: मोदी आणि शाह यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

Today's Marathi News Live: आदित्य ठाकरेंचा 30 एप्रिलला श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात रोड शो

Gujrat Fire News | गुजरातच्या बाजारात भीषण आग, नाडियाद परिसरात वाहनं जळाली

Rahul Gandhi: भाजप हा 'आरक्षण रद्द करा' टोळीचा अड्डा आणि मोदी त्यांचे नेते, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT