नागरीकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी NCB चा वापर होतोय - जयंत पाटील Saam Tv
महाराष्ट्र

नागरीकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी NCB चा वापर होतोय - जयंत पाटील

नागरीकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी व नागरीकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी NCB चा वापर होतोय" असा आरोप जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

अमोल कलये, साम टीव्ही, रत्नागिरी

दापोली, रत्नागिरी: नवाब मलिक हे एनसीबीच्या विरोधात पुराव्यानिशी बोलत असून हे प्रकरण नागरीकांना छळण्यासाठी, बदनाम करण्यासाठी व नागरीकांना अनेक दिवस तुरुंगात ठेवण्यासाठी एनसीबीचा वापर होतोय असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दापोली येथे पत्रकार परिषदेत केला. (NCB is being used to harass and defame citizens - Jayant Patil)

हे देखील पहा -

शाहरुख खानच्या मुलाच्या बाबतीत घडलंय आणखी इतरांच्या बाबतीतही झालं असेल त्यामुळे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. एनसीबीची टीम वानखेडेच्या चौकशीसाठी आली आहे, वानखेडेंची चौकशी करतेय. वानखेडे यांनी घेतलेला दाखला व IRS मध्ये जो प्रवेश घेतला तो कोणत्या जातीच्या आधारावर घेतला याचं गणित लवकरच उकळेल आणि फसवणूक कुणी केली व कशी केली याचा खुलासादेखील लवकरच होईल असं ते म्हणाले.

त्याचप्रमाणे चौकशीसाठी आलेली एनसीबीची टीम खऱ्या गोष्टींची चौकशी करेल. त्यामुळे ही टीम चुकांवर पांघरूण घालण्यासाठी आली नसावी असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. नवाब मलिक हे सत्य गोष्टी समोर आणत आहेत त्या सत्य आहेत. केंद्राच्या या यंत्रणा चुका करुन दिशाभूल करत आहेत. या यंत्रणांचा वापर करून नागरिकांना छळण्याचा प्रकार होतोय असेही जयंत पाटील म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून मुलीवर बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT