झाशी, उत्तर प्रदेश: भारत पुर्ण स्वतंत्र नाही, भारत अर्धाच स्वतंत्र असून केवळ ९९ वर्षांच्या करारावर इंग्रजांनी स्वतंत्र केला. भारत भाडेतत्वावर आहे, (India on Lease) गांधी-नेहरुंनी पूर्ण स्वातंत्र्य घेतलं नाही असा जावईशोध लावलाय तो म्हणजे भाजप युवा मोर्चाच्या (BJP Yuva Morcha) अधिकृत प्रवक्त्या (Official Spokeperson) रुची पाठक (Ruchi pathak) यांनी. दी लल्लनटॉप (The Lallantop) नावाच्या एका हिंदी वेबसाईटने आयोजित केलेल्या एका चर्चासत्रात त्यांनी हे अजब वक्तव्य केलं आहे. यावेळी मंचावर कॉंग्रेस, बसपा, सपा अशा अनेक पक्षांचे प्रवक्ते चर्चेसाठी उपस्थित होते. रुची पाठक यांच्या या वक्तव्यानंतर त्या भयंकर ट्रोल (Trolled) होत असून भाजपनेही या वक्तव्याशी आपला संबंध नसल्याचं सांगत काढता पाय घेतला आहे. ("India's independence on a 99-year lease?" Strange statement of BJP spokesperson ruchi pathak)
झाशीतील लल्लनटॉपच्या एका कार्यक्रमादरम्यान भाजपच्या स्थानिक प्रवक्त्या रुची पाठक वादात पोहोचल्या होत्या. येथे काँग्रेसचे प्रवक्ते गौरव जैन यांनी खासगीकरणाबाबत केंद्र सरकारला घेरले. याला उत्तर देताना रुची पाठक म्हणाल्या की, 'आझादी टू इंडिया करारावर आहे. काँग्रेसने देशाचे स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या लीजवर घेतले आहे.
हे देखील पहा -
नक्की काय म्हणाल्या रुची पाठक?
भाजपच्या प्रवक्त्या रुची पाठक म्हणाल्या की, ''भारताला अजून स्वातंत्र्य मिळालेले नाही. देशाला ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर स्वातंत्र्य मिळाले. भारत पूर्णपणे स्वतंत्र नाही. याबाबत लेखी करार करण्यात आला होता. खरे तर भारत पूर्णपणे स्वतंत्र नाही. स्वातंत्र्यानंतर निवडणुका झाल्या आणि त्यानंतर १९५१ मध्ये भारतीय राज्यघटना लागू झाली. 'भारताचे स्वातंत्र्य ९९ वर्षांच्या लीजवर घेण्यात आले आहे. गांधी-नेहरूंनी पूर्ण स्वातंत्र्य घेतलं नाही. त्यावेळी निवडणूका झाल्या नव्हत्या, ब्रिटिश क्राऊनची शपथ घेतली गेली. ना की भारताच्या संविधानाची शपथ घेतलेली. आणि त्यानंतरच भारत स्वतंत्र झाला. नाहीतर ब्रिटिश क्राऊन भारताला स्वातंत्र्य देतच नव्हते. इतिहासाची पाने उलगडून बघा वाचा मग कळेल, भारत ९९ वर्षाच्या भाडेतत्वावर कॉँग्रेसने ब्रिटिशांकडून घेतला भारत संपूर्णपणे स्वतंत्र नाही." अशी मुक्ताफळं दिल्यानंतर रुची पाठक यांच्यावर देशभरीतून टीका होतेय. या विधानाबाबत काँग्रेसचे प्रवक्ते गौरव जैन म्हणतात- भाजपच्या बहुतांश प्रवक्त्यांना व्हाट्सॲप युनिव्हर्सिटीतून ज्ञान मिळते. त्यांना इतिहास आणि वस्तुस्थितीची पर्वा नाही. त्यांचा पाया खोटेपणावर आधारित आहे.
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुकांच बिगुल वाजणार आहे. यासाठी दी लल्लनटॉपने उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये सर्वपक्षीय चर्चासत्राचं आयोजन केलं होत. याचदरम्यान कॉंग्रेसवर आरोप करण्याच्या नादात हे अजब वक्तव्य करुन बसल्या आणि आता प्रचंड ट्रोल होत असून Whatsapp University मध्ये शिकून ज्ञान पाजळणाऱ्यांची कधी ना कधी पंचाईत होतेच हे पुन्ह एकदा स्पष्ट झालयं.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.