Breaking: गडचिरोलीतील चकमकीत नक्षलवाद्यांचा बडा नेता मिलींद तेलतुंबडे ठार Saam TV
महाराष्ट्र

Breaking: गडचिरोलीतील चकमकीत नक्षलवाद्यांचा बडा नेता मिलींद तेलतुंबडे ठार

यामध्ये 26 हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

गडचिरोली : जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती-कोटगुल जंगल परिसरात आज पहाटेपासून पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक पाहायला मिळाली. यात जवळपास 26 नक्षलवादी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर नक्षलवाद्यांचा बडा नेता मिलींद तेलतुंबडे ठार झाला आहे. त्याच्यावर 50 लाखांचा इनाम देखील होता, तर मिलींद तेलतुंबडे याचं कोरेगाम भिमा दंगल प्रकरणी नाव समोर आलं होतं. तसेच चार पोलिस जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे. अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी ऑपरेशनसंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. यामध्ये 26 हून अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचं त्यांनी सांगितलं आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात शनिवारी सकाळी पोलिसांचे सी-६० पथक शोध अभियान राबवीत होते. यावेळी लपून बसलेल्या नक्षल वाद्यांनी अचानक C-६० पथकावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत गोळीबार केला. या चकमकीत 26 पेक्षा जास्त नक्षलवादी ठार झाले आहेत परंतु संपुर्ण माहिती सकाळी ओळख पटल्यानंतर समोर येईल.

मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे. चकमकीत चार पोलिस जवान जखमी झाल्याचे कळते. गडचिरोलीमध्ये झालेल्या चकमकीत 26 नक्षली ठार झाले तर चार जवान जखमी झाले आहेत. त्याचबरोबर जखमी पोलिसांना हेलिकॉप्टरने नागपुरात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पोलिस जखमी झाल्याची माहिती सामला दिली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ग्यारापत्तीच्या जंगलात माओवाद्यांच्या विरोधात पोलिसांनी केलेल्या कारवाईची "आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे,"असं म्हणत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रशंसा करत पोलिसांचे कौतुक केले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope: 'या' राशीला मिळणार राजयोग,५ राशींवर राहणार देवाची कृपा; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : प्रेमाचे रूपांतर विवाहात होईल, तर काहींच्या अंगावर येतील अनेक जबाबदाऱ्या, तुमची रास यात आहे का?

Rahul Gandhi: 'एक है तो अदानी सेफ है'; राहुल गांधींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT