gondia, football saam tv
महाराष्ट्र

Football : फुटबाॅल खेळताना 'नवाेदय' च्या सहावीतील विद्यार्थ्याचा मृत्यू

या घटनेमुळे विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांना माेठा धक्का बसला.

अभिजीत घोरमारे

Gondia News : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयातील विद्यार्थांचा फ़ुटबाॅल खेळताना भोवळ येऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संगम खिलेश्वर बोपचे (वय ११ रा. सोनी, गोरेगाव, गोंदिया) असे मृतकाचे नाव आहे. (Gondia Latest Marathi News)

नवेगावबांध येथील नवोदय विद्यालयातील संगम बोपचे हा विद्यार्थी विद्यालयाच्या मैदानावर मित्रांबरोबर फुटबॉल खेळत दरम्यान त्याला भोवळ आल्याने तो मैदानातच पडला. त्याला लगेच विद्यालयाच्या शिक्षकांनी (teacher) प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगावबांध येथे नेले.

तेथे तपासणी करून त्याला साकोली येथील हृदयरोग तज्ञांकडे नेण्यात आले. मात्र उपचारपुर्वी त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेने विद्यालयातील मित्रांवर (friends) आणि बाेपचे कुटुंबावर शाेककळा पसरली आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळ्यात जोरदार पावसाला सुरुवात

Yavatmal Rain: पैनगंगा नदीला पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला, यवतमाळ- नांदेडदरम्याची वाहतूक ठप्प, दोन जणांचा मृत्यू

वाहन आणि लायसन्ससाठी आधार अन् मोबाईल अनिवार्य; जाणून घ्या लिंक करण्याची प्रोसेस

Shocking : हृदयद्रावक! बायको नांदायला येत नसल्याने नवऱ्याने ४ मुलांसह आयुष्य संपवलं

MHADA : म्हाडाचं घर विकता येतं का? जाणून घ्या घराचे नियम

SCROLL FOR NEXT