- तबरेज शेख
नाशिक जिल्ह्यात दाेन दिवसांपूर्वी सिडकोतील उपेंद्र नगर भागातील भाजी बाजारातील पाचशे रुपयांच्या बनावट नाेटांचा प्रकार ताजा असतानाच पुन्हा एकदा तसाच प्रकार सिडकोतील छत्रपती शिवाजी भाजी मार्केटमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकारमुळे नागरिक तसेच भाजी विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)
या भाजी बाजारामध्ये एका अज्ञात व्यक्तीने भाजी खरेदी करत भाजी विक्रेत्याला नकली नोट देत तिथून पळ काढला. ही पाचशेची नोट भाजी विक्रेत्यांनी निरखून बघितली असता ही नोट साध्या कागदावरच कलर झेरॉक्स करून एकमेकांना चिटकवलेली असल्याचे निदर्शनास आले. (Nashik Latest Marathi News)
भाजी विक्रेत्याची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता त्याने तिथून पळ काढला हाेता. दरम्यान संबंधित व्यक्ती काही लोकांना फसवू शकतो तसेच बाजारात ही बनावट नोट घेऊन जाऊ शकतो या अनुषंगाने भाजी विक्रेत्याने आपल्या परिचित लोकांना तात्काळ कळविले.
एकूणच कोण आहे जो नाशिकच्या (nashik) बाजारात बनावट पाचशेच्या नोटा खपविण्यासाठी प्रयत्न करीत आहे त्याचा तपास पोलिसांनी (police) लवकरात लवकर करावा अशी मागणी होत आहे. तसेंच बनावट नोट चलनात आणणाऱ्या व्यक्ती निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन करावे अथवा पोलिसांना संपर्क साधावा असे आवाहन नाशिक पोलिसांनी केले आहे. (Breaking Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.