Nashik Crime News : बहिणीला सासरी सोडण्यासाठी हिंगोलीतून आलेल्या युवकाचा भगुर शिवारात खून

या घटनेचा तपास सुरु आहे.
Crime News, nashik crime news
Crime News, nashik crime newssaam tv
Published On

- तबरेज शेख

Nashik Crime News : मुळ हिंगोलीचा रहिवाशी असलेला युवक हा त्याच्या बहिणीला भगुर शिवारात सासरी सोडण्यासाठी मगंळवारी सकाळी आला होता. या युवकाला अज्ञात इसमाने अमानुषपणे मारहाण करत ठार मारल्याची घटना रात्री उघडकीस आली. गणेश पंजाब पठाडे (२६,रा.शिरसम, हिंगोली) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. (nashik latest marathi news)

गणेश पठाडे हा त्याच्या बहिणीला नाशिकच्या (nashik) भगुर येथे सोडण्यासाठी आला होता. सकाळी नाश्ता केल्यानंतर तो घराबाहेर पडला. मात्र संध्याकाळपर्यंत पुन्हा घरी परतलाच नाही. दरम्यान संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास भगुर-देवळाली कॅम्प रस्त्यावर एक युवक बेशुद्धावस्थेत बेवारसपणे पडल्याची माहिती देवळाली कॅम्प पोलिसांना मिळाली.

Crime News, nashik crime news
Abdul Sattar Controversy : चंद्रकांत खैरे संतापले, सत्तार फेकचंद, थर्ड...

पोलिसांनी घटनास्थळ गाठले. गणेश पठाडे यास पोलिसांनी वाहनातून त्वरित लॅमरोडवरील देवळाली छावणी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तेथे काही वेळ प्रथमोपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे लक्षात येताच वैद्यकिय अधिकाऱ्यांनी पोलिसांना त्यास जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले.

Crime News, nashik crime news
Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मागितली जाहीर माफी, ४०० कोटी खर्च केले तरी रस्त्याचे काम निकृष्ट

रुग्णालयाच्या (hospital) अतीदक्षता अत्यावश्यक कक्षात त्याच्यावर उपचार सुरू असताना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी रात्री मयत घोषित केले. गणेशची बहिण प्रज्ञा कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात अज्ञात संशयित हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Crime News, nashik crime news
Koyna Dam : 'काेयने' मुळे 'वाशिष्ठी' ला पूराचा धाेका; पोफळी वीज निर्मिती प्रकल्प अधिकाऱ्यांना भीती

संशयित हल्लेखोराची ओळख पटली असून देवळाली कॅम्प पोलिसांसह (police) गुन्हे शाखांची पथके त्याच्या मागावर असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कुंदन जाधव यांनी सांगितले. मारेकऱ्याने कुठल्याही हत्याराचा खूनासाठी वापर केलेला प्रथमदर्शनी आढळून येत नाही. केवळ लाथाबुक्क्यांसह काही तरी टणक वस्तूने बेदम मारहाण गणेशला केली. या मारहाणीतच त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज जाधव यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com