navneet rana, ravi rana , eknath shinde, maharashtra , navratra saam tv
महाराष्ट्र

नवनीत राणा अनवाणी पायी चालल्या, 'एकवीरा' चं घेतलं दर्शन; शिंदेंना निवडणूक चिन्ह मिळण्यासाठी घातलं साकडं

एकनाथ शिंदे हेच खरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत असे राणा यांनी नमूद केले.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Navneet Rana : अंधेरी पुर्व येथील आमदारकीच्या रिक्त जागेवरील पाेटनिवडणुक जाहीर झाली आहे. पुढील महिन्यात या निवडणुकीसाठी मतदान हाेणार आहे. शिवसेनेच्या (shivsena) धनुष्यबाण या चिन्हाबाबत अद्याप शिंदे-ठाकरे गटाची न्यायालयीन (court) प्रक्रिया सुरु आहे. दरम्यान आज राणा दाम्पत्याने अंबादेवीच दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच धनुष्यबाण हे चिन्हं मिळावं यासाठी देवीला साकडं घातल्याचे खासदार नवनीत राणा (navneet rana) यांनी माध्यमांशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra News)

विदर्भाच कुलदैवत व अमरावतीच्या (amravati) अंबादेवी व एकवीरा देवीचं खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी दर्शन घेतलं. दोन किलोमीटर अनवाणी पायाने चालत राणा दाम्पत्याने पदयात्रा केली. त्यानंतर राणा दाम्पत्यानं माध्यमांशी बाेलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झाेड उठवली.

खासदार राणा म्हणाल्या बाळासाहेबांची खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे. एकनाथ शिंदे हेच खरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत. त्यामुळे शिंदे यांनाच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह मिळावं यासाठी अंबादेवीकडे साकडं घातलं आहे असे नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केले. (Breaking Marathi News)

आमदार रवी राणा म्हणाले अंबादेवीच्या दर्शनास आले हाेताे. शेतक-यांच्या सुखी शांतीसाठी प्रार्थना केली. बाळासाहेबांच्या संपत्तीचा वारसा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच खरे बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहेत. त्यामुळे येत्या दसरा मेळाव्यास (dasra melava) शिंदे यांच्या पाठीशी असंख्य शिवसैनिक राहतील असा विश्वास आमदार राणा यांनी व्यक्त केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

Monday Horoscope: पैशाची तंगी होईल दूर, ४ राशींना करावा लागेल खूप प्रवास, वाचा सोमवारचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update : कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक, जनसुराज्य शक्ती – आरपीआय – पीआरपी यांचा ‘सुराज्य संकल्प’ जाहीरनामा जाहीर

आदित्य ठाकरेंकडून देवेंद्र फडणवीसांची नक्कल, पाहा VIDEO

IND vs NZ : फिलिप्सची बाप फिल्डिंग; रोहित-गिल झाले शॉक, प्रेक्षकांची वाढली धकधक | Video

SCROLL FOR NEXT