Navneet Rana News, Uddhav Thackeray Aurangabad Rally News, Amravati News Saam Tv
महाराष्ट्र

अगोदर पाणी प्रश्न सोडवा, नंतर सभा घ्या; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

आज औरंगाबादमध्ये शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे.

Santosh Kanmuse

अमरावती: आज औरंगाबादमध्ये शिवसेनेची (Shivsena) जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेने गेल्या काही दिवसापासून तयारी सुरू केली आहे. या सभेवरुन आता भाजपने आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. यावरुन आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. 'अगोदर औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न सोडवा नंतर जाहीर सभा घ्या', अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. (Navneet Rana News)

आज औरंगाबादमध्ये शिवसेनेची जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलणार आहेत. या सभेसाठी शिवसेनेकडून सोशल मीडियावर टीझर शेअर केले होते. शहरात पोस्टरही लावण्यात आले आहेत, यात 'होय हे संभाजीनगरच' अशा आशयाचे पोस्टर लावले आहेत. यामुळे आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) कोणत्या विषयावर बोलणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अमरावतीच्या खडीमल गावातील पाणी टंचाईच भीषण वास्तव समोर आले आहे. खरतर मेळघाटसह अनेक गावांत पाणी टंचाई आहे. हाच मुद्दा घेऊन अमरावतीच्या खासदार नवनीत राणांना ट्रोल केले आहे. यावर नवनीत राणांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न उपस्थित केला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होते. याच सभेवरुन खासदार नवनीत राणा यांनी आगोदर औरंगाबाद मधील पाणी प्रश्न सोडवा, नागरिकांचे प्रश्न जाणून घ्या. नंतर सभा घ्यावी असा, टोलाही राणा यांनी लगावला. (Uddhav Thackeray Aurangabad Rally News)

राज्यसभेवरुनही राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर (Uddhav Thackeray) आरोप केले. अपक्ष आमदारच नाराज नाही, तर इतर अनेक पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत. राज्यातले मंत्री टक्केवारी मागतात. आमदारांना मुख्यमंत्री मिळत नाहीत, त्यामुळे अपक्ष आमदारांसह राज्यातील अनेक आमदार नाराज आहेत, असंही राणा म्हणाल्या.

मेळघाट येथील स्कायवॉक लवकरच सुरु होईल. राज्य सरकारने अनेक एनओसी दिलेल्या नव्हत्या, परवानगी घेवून ते काम लवकरच पूर्ण होईल, असंही खासदार राणा म्हणाल्या. अमरावती विमानतळावर बोलताना राणा म्हणाल्या, अमरावती विमानतळासाठी राज्याने काम पूर्ण करुन ते केंद्राडे द्यायला पाहिजे, पण तसे झालेले नाही. आता आम्ही उडान स्किममधून ते पूर्ण करत आहे, असंही राणा म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane Tourism : शाळेला सुट्टी पडली; लाडक्या मुलांसोबत प्लान करा फॅमिली ट्रिप, फिरा ठाण्यातील 'ही' २ सुंदर हिल स्टेशन्स

Jaljeera Benefits: उन्हळ्यात थंडगार जलजीरा प्यायल्याने शरीराला मिळतात हे ७ फायदे

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत तुमरकोठी गाव उजळलं; पोलीस दलाच्या प्रयत्नांनी वीज सेवा सुरू

APY Scheme: केंद्र सरकारची जबरदस्त योजना! २ कप चहाचे पैसे वाचवा अन् ₹५००० पेन्शन मिळवा

MLC Election: जय पवारांना विधान परिषदेत पाठवा! आमदार मिटकरींचं सुनेत्रा पवारांना पत्र

SCROLL FOR NEXT