Gokul Saam
महाराष्ट्र

Gokul Milk: कोल्हापूरचे राजकारण रात्रीत फिरले, हसन मुश्रीफांचा मुलगा गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी

Navid Mhasrif: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड अखेर पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली.

Bhagyashree Kamble

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड अखेर पार पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नाविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे.

गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत नाविद मुश्रीफ यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. त्यानंतर परिसरात विजयाच्या घोषणा सुरू झाल्या असून, कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नाविद मुश्रीफ यांच्या गळ्यात विजयाची माळ

कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदावरून निर्माण झालेला तिढा अखेर सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या या पदासाठी आज दुपारी ३ वाजता झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नाविद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

अध्यक्षपद महायुतीकडेच असावे

अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा दिल्यानंतर शशिकांत पाटील चुयेकर यांचे नाव अध्यक्षपदासाठी निश्चित झाले होते. मात्र, या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घालून, अध्यक्षपद महायुतीकडेच असावे, असा आग्रह धरला.

या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी संध्याकाळीच कोल्हापूर गाठले. त्यांनी आमदार सतेज पाटील, विनय कोरे, तसेच गोकुळच्या सत्ताधारी संचालकांसोबत मॅरेथॉन बैठका घेतल्या.

या चर्चांमुळे चुयेकर यांचे नाव मागे पडले आणि अध्यक्षपदासाठी अजित नरके, अमरीशसिंह घाटगे आणि नाविद मुश्रीफ यांची नावे चर्चेत आली. मात्र नरके आणि घाटगे यांच्या नावाला काही नेत्यांचा विरोध होता. घाटगे हे विरोधी पॅनलमधून निवडून आले असल्याने त्यांची अडचण निर्माण झाली.

अखेर नाविद मुश्रीफ हे एकमेव पर्याय उरले. सुरुवातीला हसन मुश्रीफ यांना गोकुळ अध्यक्षपद मुलाला देण्याची तयारी नव्हती, कारण त्यांच्याच कुटुंबाकडे कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद आहे. पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दबावाखाली त्यांनी होकार दिला, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.

नाविद मुश्रीफ हे काही दिवस परदेश दौऱ्यावर होते, मात्र गुरुवारी ते अचानक कोल्हापुरात परतले. आज दुपारी ३ वाजता झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RCB vs GT IPL 2026 Final: विजयी षटकार मारत आरसीबीने दुसऱ्यांदा जिंकली आयपीएलची ट्रॉफी

Krunal Pandya: कृणाल पांड्याचा जादूवाला चेंडू पाहून बटलर चक्रावला; क्रिकेटचा देव मात्र भारावला! कृणालचं सचिन तेंडुलकरकडून कौतुक

RCB vs GT Final: आरसीबीने सलग दुसऱ्यांदा पटकावलं विजेतेपद; विजयासह रचला इतिहास

पैसे झाडालाच लागतात; व्हिडिओ पाहून तुम्हीही होय म्हणाल, नेमकं प्रकार काय? VIDEO

भाजपकडून विधानपरिषदेसाठी ११ उमेदवारांची नावे जाहीर; कोणाला कुठून मिळाली उमेदवारी?

SCROLL FOR NEXT