Mumbai Pune Expressway Saam tv
महाराष्ट्र

Mumbai Pune Expressway : मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एक्झीट मार्ग ६ महिन्यासाठी बंद; या पर्यायी मार्गाचा करावा लागणार वापर

Navi Mumbai News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झीट येथून कळंबोली सर्कलवरून पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडे कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: महाराष्ट्र राज्य पायाभुत विकास महामंडळाकडून कळंबोली जक्शनची सुधारणा करण्यात येणार आहे. यात कळंबोली सर्कल येथे नव्याने उड्डाणंपुल व भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झीट मार्ग पुढील सहा महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील कळंबोली सर्कल येथे उड्डाणपूल उभारणीचे काम नव्याने सुरु करण्यात येत आहे. हे काम सुरु असताना याठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई वाहिनीवरील पनवेल एक्झीट मार्ग ११ फेब्रुवारीपासून पुढील ६ महिने बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून पनवेल एक्झीट येथून कळंबोली सर्कलवरून पनवेल, मुंब्रा तसेच जेएनपीटीकडे कडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

पनवेल, गोवाकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग
यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरून पनवेल, गोवा, जेएनपीटीकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. यात कोनफाटा (कि.मी. ९.६००) येथे डावीकडे वळण घेवून एनएच ४८ मार्गावरून पळस्पे सर्कल येथून वाहनधारकांना इच्छितस्थळी जाता येणार आहे.

कल्याण, तळोजाकडे जाण्यासाठी मार्ग 

तसेच मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरून (पनेवल एक्झीट) येथून तळोजा, कल्याण- शिळफाटाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सरळ पनवेल सायन महामार्गावरून पुरूषार्थ पेट्रोल पंप उड्डाण पुलाखालून उजवीकडे वळण घेवून रोडपाली येथून एन.एच ४८ महामार्गावरून इच्छितस्थळी जाण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT