भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आज स्थानिक भाजपला घरचा आहेर दिला आहे. नवी मुंबईत प्रकल्पग्रस्त दि .बा. पाटील यांच्या नावाने सध्या मोठं राजकारण केल जात आहे. ज्या नेत्यांनी दि . बा. पाटील यांना कधी नवी मुंबईत येऊ दिल नाही, आज तेच नेते त्यांच्या नावाने राजकारण करत आहेत. तर काही नगरसेवक दि.बा. पाटील यांच्या आणि प्रकल्पग्रस्तांच्या नावाने संघटना काढून स्वतःच कामांची कंत्राटं मिळवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची वाटचाल उद्यापासून मुंबईकडे होणार आहे. २३ डिसेंबर २०२३ रोजी घोषणा करून २० जानेवारीपर्यंत सरकारला कुणबी आरक्षण द्या नाहीतर मुंबईत उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता.
मात्र, सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकामध्ये मराठ्यांना न्याय मिळेल असं चित्र दिसत नसल्यानं मनोज जरांगे यांनी आता चर्चा नाही तर कृती करा म्हणत काहीही होवो मुंबईत येणारच अशी घोषणा केली आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी भाजप राज्यातील विरोधकांना चौकशीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्नात दिसत आहे. रवींद्र वायकर, ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण आणि आमदार राजन साळवी यांच्यानंतर आता किशोरी पेंडणेकर चौकशीच्या फेऱ्यात अडकू शकतात. आज ईडीने बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात ईडीने त्यांना समन्स बजावलाय. पेंडणेकरांना गुरुवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.