Kharghar Man beaten to helmet  SaamTV
महाराष्ट्र

Navi Mumbai Crime: कट मारल्याने डोक्यात तिडीक गेली, खाली उतरुन हेल्मटेने जबर मारहाण; पोलिसांत तक्रार करतानाच...पाहा Video

Navi Mumbai Killed Hitting With a Helmet: दुचाकीवरील इसमाने वाहनचालकाच्या डोक्यात हेल्मेट मारत त्याला मारहाण केली.सदर घटनेनंतर जखमी इसम खारघर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यासाठी गेला असता तेथेच त्याचा मृत्यू झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही

नवी मुंबई : खारघर येथील उत्सव चौक परिसरात किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत एका इसमाचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीस्वाराला मागून येणाऱ्या वाहनाने कट मारल्याने हा वाद उफाळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दुचाकीवरील इसमाने वाहनचालकाच्या डोक्यात हेल्मेट मारत त्याला मारहाण केली.सदर घटनेनंतर जखमी इसम खारघर पोलीस ठाणे येथे तक्रार नोंदविण्यासाठी गेला असता तेथेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. शिवकुमार शर्मा असं मयत इसमाचं नाव आहे. खारघर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खारघर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

अंबरनाथमध्ये विवाहित महिलेची हत्या

दरम्यान, अंबरनाथच्या बारकूपाडा भोईर चाळ परिसरात शेजारी राहणारे सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांची मैत्री होती. सीमाचा नवरा तिला सोडून गेल्याने ती १३ वर्षांच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. बेबी सिटिंगमध्ये काम करणाऱ्या सीमाने राहुल याच्याशी असलेल्या मैत्रीतून त्याला अडीच लाख रुपये उसने दिले होते. मात्र, ते पैसे तो परत करू शकत नसल्याने तिने माझ्याशी लग्न कर किंवा माझे पैसे परत कर, असा तगादा लावला होता. तसेच लग्न केले नाही तर बलात्काराची केस करण्याची धमकी तिने राहुलला दिली होती. या दुहेरी कात्रीत सापडलेल्या राहुलने अखेर सीमाचा काटा काढायचे ठरवले.

सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरातील साईबाबा मंदिराशेजारच्या पायऱ्यांवर तो आज दुपारी भेटला. तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि राहुलने सीमावर चाकूने सपासप अनेक वार करत तिथून पळ काढला. यानंतर तो स्वतः जाऊन पोलिसांसमोर हजर झाला, असं सांगितले जातंय. दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेतील सीमाला लोकांनी उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं, मात्र तिचा तिथे मृत्यू झाला. सीमाच्या पोटावर, ओटीपोटाकर, मांडीवर आणि मुख्य म्हणजे छातीवर वर्मी घाव करण्यात आलेत. यामुळे ती वाचू शकली नाही. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाक धाव घेत पंचनामा सुरू केला, तर दुसरीकडे राहुल भिंगारकर याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केलीये. या संपूर्ण घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bacchu Kadu: आमदार, खासदार, पालकमंत्री, कलेक्टर मस्त ऐश करत आहेत; सुट्ट्या काढून पळाले सगळे – बच्चू कडू संतापले|VIDEO

Maharashtra Live News Update : धनत्रयोदशीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची श्री धन्वंतरी रूपात अलंकारिक पूजा

Genius Floating Shoes: पाण्यावर चालणार माणूस? पाण्यावर चालता येणारे शूज?

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

SCROLL FOR NEXT