Kharghar examination center Class 12th board answer papers on road  Saam Tv News
महाराष्ट्र

Navi Mumbai : बाईकने जाताना १२वीच्या २५ उत्तरपत्रिकांचा गठ्ठा रस्त्यावर, विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ

12th Board Question Papers on Road : दहावी, बारावीच्या कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडालेला असतानाच बारावीच्या उत्तरपत्रिका चक्क रस्त्यावर आढळल्यात. कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार पाहूया एक रिपोर्ट.

Prashant Patil

नवी मुंबई : दहावी, बारावी बोर्डाच्या कारभाराचे वाभाडे नेहमीच काढले जातात. त्यात आणखी एका घटनेची भर पडलीये. बारावीच्या उत्तरपत्रिका चक्क रस्त्यावर आढळल्या आहेत. नवी मुंबईमधील कामोठे येथे रस्त्याशेजारी असलेल्या भूखंडावर १२ वी कॉमर्सच्या बुक किपिंग या विषयाच्या उत्तरपत्रिका सापडल्याने खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु असल्यानं संताप व्यक्त होतोय.

मनसे कार्यकर्त्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्व उत्तर पत्रिका कामोठे पोलीस ठाण्यात जमा केल्या. पेपर तपासणी करणाऱ्या शिक्षकाकडून हा प्रकार झाल्याचं उघड झालंय. शिक्षक दुचाकीवर जात असताना गाडीवरून २५ उत्तरपत्रिकांचा एक गठ्ठा खाली पडला होता. या गठ्ठ्यामधील काही पेपर रस्त्यावर पडले मनसे कार्यकर्त्यांच्या जागरूकतेने हा प्रकार लक्षात आला. ही धक्कादायक घटना कोकण विभागीय शिक्षण मंडळाला कळवण्यात आली. हे पेपर खारघरमधील एका परीक्षा केंद्रातील आहेत. परीक्षा केंद्र अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातून उत्तरपत्रिका ताब्यात घेतल्या आहेत.

एकीकडे बोर्डाच्या कॉपी मुक्त अभियानाचा फज्जा उडाला आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिका चक्क रस्त्यावर सापडल्या आहेत. बारावीची परीक्षा विदयार्थ्यांच्या आयुष्याची दिशा ठरवत असते. विद्यार्थ्यांनी वर्षंभर केलेल्या मेहनतीचे पेपर अशा प्रकारे रस्त्यावर टाकले जातं असतील तर विद्यार्थ्याच्या भवितव्याशी केलेला हा खेळ आहे. आता याची तरी जबाबदारी शिक्षण मंडळ घेणार का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT