Navi Mumbai International Airport Saam
महाराष्ट्र

हायवे, रेल्वे, लोकल अन् मेट्रो... नवी मुंबई विमानतळावर कोणत्या मार्गानं कसं जाल? वाचा सविस्तर

Navi Mumbai International Airport: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबरला सुरू; सरकारची मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी योजना जाहीर. प्रवाशांना लवकर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ गाठता येणार.

Bhagyashree Kamble

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबरपासून कार्यान्वित होणार.

  • अटल सेतूमुळे दक्षिण मुंबईहून विमानतळ फक्त २० मिनिटांत गाठता येणार.

  • पहिल्या टप्प्यात २० दशलक्ष प्रवाशांची हाताळणी होणार.

  • रस्ते, मेट्रो, रेल्वे आणि बससेवेच्या माध्यमातून मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित.

नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ ३० सप्टेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई आणि राज्यातील विविध भागातून विमानतळापर्यंत सुलभतेनं पोहोचण्यासाठी मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी योजनेला अंतिम रूप दिले आहे. यात रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि बससेवा एकत्रित करण्यात आल्या आहेत. जेणेकरून जवळपासच्या तसेच दुरच्या प्रवाशांची सोय होईल.

उद्घटनानंतर सुरूवातीला तासाला ८ ते १० विमाने उड्डाण होईल. २०२६पर्यंत प्रतितास ३० पर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. एनएमआयए अधिकाऱ्यांच्या मते, विमानतळाचा पहिला टप्पा दरवर्षी २० दशलक्ष प्रवाशांना हाताळण्यासाठी डिझाईन केला आहे. त्याच्या सुरळीत कामकाजासाठी अॅप्रोच कनेक्टिव्हिटी महत्वाचा घटक असेल.

यासंदर्भात अधिकारी म्हणाले, 'NMIAL आगामी पायाभूत सुविधांचा वापर करून मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी विकसित करण्यासाठी सरकारी अधिकाऱ्यांशी सक्रियपणे सहकार्य करत आहे. रस्ते, रेल्वे आणि वॉटर ट्रान्सपोर्ट या माध्यमांतून विनानतळ गाठणं सहज उपलब्ध होईल. यामुळे गर्दीचे व्यवस्थापन होईल', असे एनएमआयए प्रवक्त्यांनी सांगितले.

रस्ते कनेक्टिव्हिटी

या योजनेचा केंद्रबिंदू म्हणजे मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. २२ किमी लांबीचा अटल सेतू दक्षिण मुंबईतील शिवडीला नवी मुंबईतील न्हावा शेवाशी जोडतो. यामुळे प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होतो. दक्षिण मुंबईतील प्रवासी अवघ्या २० मिनिटांत उलवे येथे पोहचू शकतील.

सायन पनवेल महामार्ग हा विमानतळाचा प्रमुख प्रवेशमार्ग असून, तो मुंबई शहराला चेंबूर, नेरूळ आणि बेलापूरमार्गे पनवेलशी जोडतो. तसेच Eastern Freeway हायवे हा देखील आणखी एक महामार्ग पर्याय आहे. हा महामार्गही दक्षिण मुंबईला थेट चेंबूरशी जोडतो.

याशिवाय सिडको नवी मुंबईचे नियोजन प्राधिकरणाकडून नवी मुंबई विमानतळाजवळ एक नवीन एलिव्हेटेड कॉरिडॉर उभारण्यात येत आहे. हे नवीन एलिव्हेटेड कॉरिडॉर ठाणे ते नवी मुंबईशी जोडलेला असेल. सहा इंटरचेंज असलेल्या या मार्गामुळे प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून अवघ्या मिनिटांपर्यंत कमी होईल.

बस सेवा

MSRTC पुणे, ठाणे, दादर, वाशी आणि पनवेलसारख्या प्रमुख ठिकाणांहून, एअरपोर्ट एक्सप्रेस इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात येणार आहे. या सेवांमध्ये इलेक्ट्रिक बसेस असतील.

रेल्वे आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी

पनवेल रेल्वे स्थानकाला विमानतळासाठी फीडर पॉइंट म्हणून विकसित केले जात आहे. पुणे, रायगड, नाशिक आणि कोकण पट्ट्यातून येणारे प्रवासी पनवेलपर्यंत रेल्वेने येऊन विमानतळ शटल बसेसचा लाभ घेऊ शकतील.

प्रवाशांना कसं गाठता येईल नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ

  • दक्षिण मुंबईतील प्रवासी अटस सेतूमार्गे अवघ्या ४० मिनिटांत विमानतळावर पोहोचू शकतील.

  • ठाणेकरांना थेट विमानतळ एक्स्प्रेस बससेवेचा लाभ होईल.

  • पुणे आणि रायगडमधील प्रवासी पनवेलपर्यंत रेल्वेने येऊन शटल सेवांचा उपयोग करू शकतील.

  • उलवे, खारघर, कामोठे आणि पनवेलमधील स्थानिक प्रवाशांना फीडर बसेसची सोय उपलब्ध होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : किरकोळ वाद टोकाला गेला; रागाच्या भरात मित्राला नदीत ढकलले, तरुणाचा मृत्यू, महाडमध्ये खळबळ

Gauri Nalawade: 'स्वप्नांच्या पलीकडे' फेम गौरी नलावडेचा नवीन लूक, फोटो पाहून वाढली काळजाची धडधड

Maratha SEBC Reservation: शैक्षणिक मागासलेपणाचा युक्तिवाद पूर्ण, आता सामाजिक-आर्थिक मुद्द्यांवर सुनावणी होणार

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दिला भाजपला धक्का

भूतान-श्रीलंकेतून महाराष्ट्रात आलेल्या तिबोटी खंड्याचा जीव वाचवण्यात यश

SCROLL FOR NEXT