Navi Mumbai contractor Gajanan Devkate 
महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुन्हा कंत्राटदाराची आत्महत्या; वर्षभरात 3 कंत्राटदारांनी संपवलं जीवन

Contractor End His Life : आता बातमी आहे कंत्राटदाराच्या आत्महत्येची. थकीत बिलं कंत्राटदारांच्या जीवावर उठली आहेत...नवी मुंबईतल्या अशाच एका कंत्राटदारानं आपलं जीवन संपवलंय. त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय? कंत्राटदारांच्या या स्थितीला कोण जबाबदार आहे? पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट.

Suprim Maskar

दोन कोटींची बिलं थकल्यानं नवी मुंबईतल्या एका कंत्राटदारानं आपलं जीवन संपवलंय. वेळेत कामं करुनही पैसे मिळत नसल्यानं कंत्राटदार गजानन देवकतेंनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केलीय... वर्षभरापूर्वी कंत्राटदार गजानन देवकते यांची बिलं थकल्यानं कार्यकारी अभियंत्यांना पत्र लिहिलं होतं. त्यात बिलांसाठी 10 वेळा चकरा माराव्या लागत असल्याची उद्विग्नताही व्यक्त केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात गजानन देवकते लिहतात.

कंत्राटदारांची विभागनिहाय किती कोटींची बिलं थकीत आहेत पाहुयात GFXच्या माध्यमातून.

विभागनिहाय थकीत बिलं (कोटी रुपयांमध्ये)

सार्वजनिक बांधकाम - 17,500

आदिवासी विकास - 9,881

ग्रामविकास विभाग - 1,181

पाणीपुरवठा - 40,000

जलसंपदा - 7,000

पर्यटन विभाग - 1,100

इतर विभाग - 10,000

*अंदाजे थकीत बिलं - 86,662

गेल्या वर्षभरात तीन कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या आहेत.

वर्षभरात 3 कंत्राटदारांच्या आत्महत्या

हर्षल पाटील

सांगली

जुलै 2025

पी व्ही वर्मा

नागपूर

सप्टेंबर 2025

गजानन देवकते

नवी मुंबई

25 ऑगस्ट 2026

नुकतीच कंत्राटदारांनी थकीत बिलांच्या मुद्द्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली..त्यानंतर अवघ्या २४ तासांत नवी मुंबईतल्या कंत्राटदाराच्या आत्महत्येची बातमी समोर आली. यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधलाय. शासकीय यंत्रणेच्या लालफितीच्या कारभारामुळे आणि देयकांच्या विलंबामुळे आज शेतकऱ्यांपाठोपाठ कष्ट करून पोट भरणारे अनेक लहान कंत्राटदार देशोधडीला लागलेत. गजानन देवकते यांच्या आत्महत्येने पुन्हा एकदा प्रशासकीय दिरंगाईचे विदारक सत्य समोर आणलंय. एकीकडे कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींच्या कामाची निविदा प्रक्रिया राबवली जातेय. तर दुसरीकडे थकीत बिलं लहान कंत्राटदारांच्या जीवावर बेतले आहेत. त्यामुळे आणखी लहान कंत्राटदारांनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी सरकारनं तोडगा काढण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नायब तहसीलदाराची गुंडगिरी? नायब तहसीलदारांनं धरली शेतकऱ्याची कॉलर

Adani-Ambani Face-Off: मराठी सण गुजराती ब्रँडिंग; गणेशोत्सवात अदानी-अंबानी वॉर

कंगना-क्रितीच्या वादात राहुल गांधींची उडी; क्रिती सॅननच्या जाहिरातीनं राजकारण तापलं

Firing On Singer: जिमबाहेर घात लावून बसले, बाहेर येताच गायकावर झाडल्या धाडधाड २० गोळ्या

Video : दहाव्या मजल्यावरुन महिला पडली, झाडामुळे बचावली, रेस्क्यू ऑपरेशन

SCROLL FOR NEXT