सिद्धेश म्हात्रे
Navi Mumbai News : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गोवर या आजाराच्या संसर्गाचे प्रमाण वाढले आहे. त्यानंतर आता नवी मुंबईत देखील गोवरचे 6 रूग्ण आढळले आहेत. नवी मुंबईतही गोवरच्या रुग्णांची संख्या वाढल्याने नवी मुंबईकरांची चिंता वाढली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील शासकीय आरोग्य सतर्क झाल्या आहेत. (Latest Marathi News)
नवी मुंबईतही गोवरच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. आज, गुरुवारी नवी मुंबईत गोवरचे ६ रुग आढळून आले आहेत. मुंबईनंतर नवी मुंबईतही गोवरचे रुग्ण आढळल्याने नवी मुंबईकरांची चिंता वाढली आहे. त्यामुळे नवी मुंबईत गोवरच्या संशयित रूग्णांची संख्या १६० झाली आहे.
गोवरबाधित रुग्णांवर नवी मुंबईतील नेरुळ येथील महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या २३ नागरी आरोग्य केंद्रनिहाय गोवर बाधित आणि संशायित रुग्णांचे सर्वेक्षण सुरू आहे. तसेच नवी मुंबईत गोवर विशेष कक्षाची देखील स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती नवी मुंबई मनपाचे मुख्य आरोग्य अधिकारी डॉ प्रमोद पाटील यांनी दिली.
मुंबईत (Mumbai) गोवरच्या रुग्णांची वाढत आहे. अनेक गोवर संशयित रुग्ण हे मुंबईतील कस्तुरबा सहित विविध रुग्णालयात उपचार घेत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील गोवर प्रार्दुभावामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांची आणि त्याच्या नातेवाईकांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कस्तुरबा रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री शिंदे यांनी उपचारांबाबत आणि अनुषंगिक बाबींची माहिती घेतली. नातेवाईकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.