Jayant Patil Azad Maidan Shaktipeeth Highway Protest Saam Tv News
महाराष्ट्र

Jayant Patil : माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटील यांच्या वक्तव्याने खळबळ

Jayant Patil Azad Maidan Speech : राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना एक खळबळजनक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका.

Prashant Patil

मुंबई : शक्तिपीठ महामार्गाविरोधात आज बुधवारी मुंबईत आंदोलन झालं. मुंबईतील आझाद मैदानात हजारो शेतकरी कुटुंबासह दाखल झाले होते. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यासह १२ जिल्ह्यातील शेतकरी आंदोलनासाठी मुंबईत आले. यावेळी आंदोलनकर्त्यांना भेट देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते पोहचले. यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते तथा शिवसेना ठाकरे गटाचे अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्य जयंत पाटील यांचा समावेश होता. यावेळी जयंत पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना संबोधित करताना एक खळबळजनक वक्तव्य केलं. ते म्हणाले की, माझं काही खरं नाही, माझ्यावर विश्वास ठेवू नका, जयंत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा अर्थ काय? त्यांचा रोख कोणाकडे होता? यासंदर्भात स्पष्टपणे जयंत पाटील भाषणात काहीच बोलले नाही. मात्र, यावेळी राजू शेट्टी यांनी आपलं ऐकलं असतं तर ते खासदार राहिले असते, असंही पाटील म्हणाले. लोकसभेची निवडणूक राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीसोबत लढवली नव्हती. त्याचा संदर्भ देत जयंत पाटील म्हणाले, राजू शेट्टी आमचा सल्ला ऐकत नाही. त्यांनी माझं ऐकलं असतं तर ते आज खासदार राहिले असते. आपली एकी कायम ठेवा. संघर्ष करण्यासाठी ठाम रहा, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

भाषणात जयंत पाटील यांनी राजकीय फटकेबाजी करत सरकारला घेरलं. विधानसभा निवडणुकीत आमचा दारुण पराभव झाला आहे. राजू शेट्टी यांना माहिती आहे, निवडणुकीमध्ये किती पैसे वाटले जातात. त्यांना चांगला अनुभव आला आहे. आम्ही भाषण करुन दमलो आहोत. कारण लोकांना पैसे देऊन शांत केलं जातं. तसेच हिंदुत्व समोर असतं. मग तुमच्या अंगावरुन शक्तीपीठ जाईल, अशी फटकेबाजी पाटलांनी यावेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत सोनं स्वस्त; ३००० रुपयांची घसरण, ग्राहकांची गर्दीच गर्दी

Bigg Boss 19 : बापाने केली लेकाची कानउघाडणी; सलमान खानने अमाल मलिकला दिली शेवटीची वॉर्निंग, पाहा VIDEO

Kurkurit Chakali: कुरकुरीत चकली कशी बनवायची?

धारदार हत्याराने तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कापला अन्...; रक्ताच्या थारोळ्यात पडला, सशंय कुणावर?

Box Office Collection: 'कांतारा'ची बॉक्स ऑफिसवर गर्जना; तर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' निघावला फुसका बार

SCROLL FOR NEXT