Hit And Run  Saam Tv
महाराष्ट्र

Hit And Run : 'हिट अँड रन' प्रकरणात किती शिक्षा ? काय सांगतो कायदा , वाचा सविस्तर

Rohini Gudaghe

मुंबई : भरधाव वेगातील वाहन रस्त्यावरील एखाद्या व्यक्तीला उडवते. घटनेनंतर पळ काढते, यालाचा हिट अॅण्ड रन असं म्हणतात. राज्यात देखील हिट अँड रन प्रकरणांचा आलेख वाढतच चाललाय. दरवर्षी अशा अपघातांमध्ये हजारो मरतात आणि लाखो जखमी होतात. हे लक्षात घेऊनच सरकारनं नवीन फौजदारी कायद्यामध्ये हिट अँड रनबाबत अतिशय कडक तरतुदी केल्या आहेत. त्या नेमक्या काय आहेत, हिट अॅण्ड रन प्रकरणात कोणती शिक्षा मिळते? याबद्दल आपण सविस्तर जाणून घेवू या.

मुंबईतील वरळी परिसरात ७ जुलै रोजी सकाळी एका महिलेचा हिट अँड रन प्रकरणामध्ये मृत्यू झाला होता. एका अलिशान कारने दुचाकीवरून जाणाऱ्या जोडप्याला धडक दिली होती. पोलिसांनी दिलेल्या ( Hit And Run Law ) माहितीनुसार, शिंदे गटातील शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा हा भरधाव वेगात कार चालवत होता. आता प्रश्न असा पडतोय की, जर याप्रकरणी खटला चालू राहिला अन् मिहीर दोषी ठरला, तर त्याला नवीन कायद्यानुसार किती वर्षांची शिक्षा होईल?'हिट अँड रन' प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) तुलनेत भारतीय न्यायिक संहितेमध्ये यांसदर्भात कठोर तरतुदी करण्यात आल्या आहेत.

हिट अँड रन प्रकरणात काय शिक्षा ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या कायद्यात हिट अँड रनचे प्रकरण असेल, तर आरोपीने पोलिसांना कळवले. घटनेतील जखमींना हॉस्पिटलमध्ये नेले किंवा घटनास्थळांवरून पळून गेले तरी सारखीच शिक्षा होत ( Hit And Run Law Punishment) होती. दोन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा, अशी तरतूद होती. परंतु आता या कायद्यामध्ये बदल झालाय. तो नेमका काय आहे?

नवीन फौजदारी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर, 'हिट अँड रन' प्रकरणात जर आरोपीने पोलीस किंवा दंडाधिकाऱ्यांना माहिती दिली. जखमींसाठी रुग्णवाहिका बोलावली, तर त्याला पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड होईल. परंतु आरोपी घटनास्थळावरूव पळून गेला तर त्याला १० वर्षांचा तुरुंगवास होईल आणि दंड देखील ठोठावला जाईल, असं नमूद करण्यात आलंय.

'हिट अँड रन'मध्ये अगोदर काय शिक्षा होती?

१ जुलैपूर्वी हिट अँड रन प्रकरणांमध्ये भारतीय दंड संहिता (IPC) कलम २७९ (निष्काळजीपणे वाहन चालवणे), ३०४A (निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे) आणि ३३७-३३८(जीवन धोक्यात आणणे) अंतर्गत खटले नोंदवले जात ( Hit And Run Fine) होते. आयपीसी अंतर्गत दोन वर्षांचा कारावास आणि दंडाची तरतूद होती. काही विशेष प्रकरणांमध्ये आयपीसीचे कलम ३०२ देखील जोडले जात होते.

आता नवीन हिट अँड रन (Accident News) कायद्यानुसार अपघातानंतर पोलिसांना न सांगता वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला, तर त्याला १० वर्षांचा कारावास आणि ७ लाख रुपयांचा दंड देखील होऊ शकतो. हा गुन्हा जामीनपात्र आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : बीआरएसएसचे अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत; आज 'तुतारी' हाती घेणार

Bachchu Kadu : बच्चूभाऊंना विधानसभेच्या तोंडावर महायुतीकडून 'कडू' घास; एकमेव आमदार पळवला!

Viral News : रामाची भूमिका साकारणाऱ्या व्यक्तीला हार्ट अटॅक; मंचावरच सोडला जीव, धक्कादायक VIDEO

Pune Crime : पुणे हादरलं! वारज्यात घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार, शहरात संतापाची लाट

Hypertension and High Cholesterol: कोलेस्ट्रॉलमुळे हाय ब्लड प्रेशरचा त्रास? वाचा तज्ज्ञांनी काय काय सांगितलं

SCROLL FOR NEXT