Farmer Suicide Saam Tv
महाराष्ट्र

Farmer Suicide: बँकेचं कर्ज कसं फेडायचं, या चिंतेतून तरुण शेतकऱ्याचा गळफास

दिंडोरी येथीाल निळवंडी पाडे या गावात ही घटना घडलीये.

सकाळ वृत्तसेवा

तबरेज शेख

नाशिक: नाशिक जिल्ह्यात पुन्हा एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दिंडोरी येथीाल निळवंडी पाडे या गावात ही घटना घडलीये. 7 ते 8 लाख रुपयांचं कर्ज कसं फेडायचं या चिंतेतून या तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती आहे. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे (Nashik Young Farmer Commit Suicide Due To Bank Loan).

नाशकातील (Nashik) दिंडोरी तालुक्यातील निळवंडी पाडे येथील संदीप राजेंद्र भुसाळ या तरुण शेतकऱ्याने एका बँकेतून कर्ज घेतले होते. घेतलेले कर्ज (Loan) फेडणे अशक्य होऊ लागल्याने नजीकच्या काळात बँकेचा तगादा लागू शकतो. ते आपण फेडू शकत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या तरुण शेतकऱ्याने याबाबतची ऑडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर शेअर करत गळफास घेत आत्महत्या केली.

माझ्या आत्महत्येला (Suicide) कोणालाही कारणीभूत धरु नये, मी कर्जामुळे आत्महत्या करत असल्याचं तो ऑडिओ क्लिपमध्ये म्हणतोय. या ऑडियो क्लिपमध्ये त्याने एका बँकेचे नाव घेतले असून बँकेच्या वसुली कारणाऱ्यांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच त्यांने म्हटलं आहे. त्यामुळे आता दिंडोरी पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपुरातून हजारो मराठा बांधव मुंबईकडे रवाना

Lalbaugcha Raja Darshan: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाबंच लांब रांगा, भाविकांनी रात्र रस्त्यावर बसून काढली, VIDEO

Sayali Sanjeev: सायली संजीवच्या भाचीचं नाव काय?

Pune : 'ड्राय डे’ला मध्यवर्ती भागात दारू विक्री; मटका किंगसह तिघांवर गुन्हा, लाखोंचा साठा जप्त

Manoj Jarange Morcha: मराठा मोर्चादरम्यान दुर्दैवी घटना, मनोज जरांगेंच्या सहकाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

SCROLL FOR NEXT