Pune : 'ड्राय डे’ला मध्यवर्ती भागात दारू विक्री; मटका किंगसह तिघांवर गुन्हा, लाखोंचा साठा जप्त

Pune News : पुणे शहरात २७ ऑगस्टला ड्राय डे घोषित करण्यात आला होता. अर्थात कोठेही दारू विक्रीस परवानगी नव्हती. असे असताना मध्यवर्ती परिसरात दारू विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे
Pune News
Pune NewsSaam tv
Published On

सागर आव्हाड 
पुणे
: गणेश चतुर्थीला लाडक्या गणरायाचे आगमन झाले असताना या निमित्त संपूर्ण पुणे शहरात बुधवारी ‘ड्राय डे’ घोषित करण्यात आला होता. असे असताना देखील आदेशाचे उल्लंघन करत शहराच्या मध्यवर्ती भागात देशी- विदेशी दारूची विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी खडक पोलिसांच्या कारवाई करत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गणेशोत्सवाला कालपासून म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी जल्लोषात सुरवात झाली. सगळीकडे बाप्पाचे स्वागत करत प्रतिष्ठापना करण्यात आली. पुणे शहरात तर गणेशोत्सवाची धूम पाहण्यास मिळाली. तर काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त देखील तैनात होता. इतकेच नाही तर पुणे शहरात २७ ऑगस्टला ड्राय डे घोषित करण्यात आला होता. अर्थात कोठेही दारू विक्रीस परवानगी नव्हती. असे असताना मध्यवर्ती परिसरात दारू विक्री होत असल्याचे उघडकीस आले आहे. 

Pune News
Buldhana : राजुर घाटात एसटीने १७ मेढ्यांना चिरडले; मेंढपाळांचे दीड ते २ लाखाचे नुकसान

१ लाख १० हजाराचा मुद्देमाल जप्त 

दरम्यान पोलीस तैनात असताना हा प्रकार सुरु असताना खडक पोलिसांनी शाहू चौकातील रोनक बार येथे कारवाई केली आहे. ड्राय डेच्या दिवशी बारमध्ये दारू विक्री केली जात असल्याचे उघड झाले. या ठिकाणाहून विविध ब्रँडच्या देशी- विदेशी दारूच्या शेकडो बाटल्या, रोख रक्कम व मोबाईल फोन असा सुमारे १ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

Pune News
Nanded Heavy Rain : नांदेड जिल्ह्यात पुन्हा पावसाचे थैमान; पाच तालुक्यात अतिवृष्टी, जनजीवन विस्कळीत

तीन जणांवर गुन्हा दाखल 

तर या प्रकरणात खडक पोलिसांनी वैभव विजय डोंगरे (रा. शाहू चौक, शुक्रवार पेठ), गुडुकुमार भोलाकुमार कुमार (रा. रोनक बार, शुक्रवार पेठ) व कुख्यात मटका किंग नंदू नाईक (रा. रोनक बार, शुक्रवार पेठ) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com