NASHIK WATER CONTAMINATION saam tv
महाराष्ट्र

नाशिककरांच्या पाण्यात कॅन्सरचं केमिकल? 10 कंपन्यांना टाळं, इतर कंपन्यांचं काय?

Cancer-Causing Chemical Found in Nashik Water: एकीकडे राज्यात पाणीटंचाई निर्माण झालेली असताना दुसरीकडे पाण्यामुळे नागरिकांवर महाभयंकर रोगाची टांगती तलवार आहे. घरात नळाद्वारे चक्क कॅमिकलयुक्त पाणी येतंय. त्यामुळे तब्बल 25 हजार जणांचा जीव धोक्यात आलाय. हा सगळा प्रकार नेमका कुठे घडलाय?... नागरिकांच्या जीवाशी नेमकं कोण खेळतंय?... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

नाशिककरांच्या घराघरात नळाला आलेलं पाणी हे कॅन्सर घेऊन येतंय. होय तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरंय. नाशिकमधून आलेली ही बातमी केवळ धक्कादायक नाही, तर थरकाप उडवणारी आहे. नाशिकच्या अंबड औद्योगिक परिसरातील दत्तनगरमध्ये नळांतून आणि बोअरवेलमधून आलेलं पाणी कॅन्सरचा आजार घेऊन आलंय. पिवळधमक पाणी त्यात उग्र वास पाहिल्यानंतर नागरिकांनी यासंदर्भात तक्रार केली. तोपर्यंत उशिर झाला होता. कारण हे पाणी वापरणाऱ्या अनेकांना रिएँक्शन आली. बघा या मुलांच्या हातावर कशी पुरळ उठली.

तब्बल 19 नागरिकांना त्वचेचा हा गंभीर आजार जडल्यानंतर झालेल्या तपासणीत जे समोर आलं ते तर पायाखालची जमीन सरकवणारं होतं. नळातून येणाऱ्या या पाण्यात चक्क कॅन्सर निर्माण करणारं भयंकर 'क्रोमियम हेक्साव्हॅलेंट' हे विषारी रसायन सापडलंय. तपासणी अहवालात पाण्यात क्रोमियमचे प्रमाण ०.०५ मिलिग्रॅम असण्या ऐवजी चक्क ५०.३ मिलिग्रॅम इतकं आढळलं. म्हणजेच सामान्य मर्यादेपेक्षा तब्बल १००० पट जास्त 'कॅन्सरजन्य विष' नाशिककरांच्या पोटात गेलं. या एमआयडीसीतील अनेक कंपन्यांनी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा बंद ठेवल्यान हे विषारी रसायन पाण्यात मुरलं आता प्रशासनानं ५० हून अधिक कारखान्यांची तपासणी केल्यानंतर 10 कंपन्यांना टाळं ठोकण्यात आलंय. या पाण्यामुळे आरोग्यावर काय परिणाम होतात तेही एकदा पाहा,

नाशिककरांच्या पाण्यात कॅन्सरचं केमिकल?

आतड्याचा आणि पचनसंस्थेचा कॅन्सर होण्याचा मोठा धोका

तीव्र पोटदुखी, मळमळ आणि जठरामध्ये अल्सर निर्माण होतो

लिव्हरचं गंभीर नुकसान होऊन त्याचे कार्य बिघडते

किडनी निकामी होण्याचा किंवा खराब होण्याचा धोका

रक्ताची कमतरता आणि शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते.

नाशिककरांना कॅन्सरचं पाणी पाजणाऱ्या या कंपन्यांवर आता जुजबी कारवाई झाली, या कारवाईचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आलाय. मात्र या कंपन्यांवर कलम ३०२, ३०४ आणि ३०७ अंतर्गत कारवाई करण्याची मागणी होऊ लागलीय. एमआयडीसीचे अधिकारी अशा जीवघेण्या कंपन्यांना परवानगी देतातच कशी? या कंपन्यांना फिटनेस सर्टिफिकेट देणारं पर्यावरण खातं आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ कुठे आहे? त्यामुळे याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

Wednesday Horoscope: काही राशींचा आत्मविश्वास वाढणार, तर काहींना मित्रांची मिळणार मदत; वाचा राशीभविष्य

ऊस दरावरून दोन माजी मंत्र्यांनी एकमेकांचे बाप-काका काढले

काँग्रेसच्या आंदोलनात नेहा बोरा फ्रंटफूटवर, पोलिसांना भिडणारी नेहा बोरा नेमकी कोण?

सोमेश्वरवर 'पवारांचीच' सत्ता; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीचा 21 जागांवर दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT