Nashik: आईलाच करावी लागली मुलीची डिलिव्हरी Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: संतापजनक! रुग्णालयातील डॉक्टर- कर्मचारी सुट्टीवर, आईलाच करावी लागली मुलीची डिलिव्हरी

जागतिक महिला दिन ( Womens Day) दोन दिवसांवर आलेला असतांनाच हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख..

Nashik: जागतिक महिला दिन अवघ्या दोन दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे राज्यभरात महिलादिनाची जय्यत तयारी सुरू आहे. त्याचबरोबर देशभरात मेट्रो, स्मार्ट सिटीचे जाळे तयार होत असतानाच सामान्य नागरिक मात्र मूलभूत गरजांपासूनच वंचित असल्याचे चित्र दिसत आहे. असाच नाशिकमध्ये एक लाजिरवाणा प्रकार समोर आला आहे. ज्यामुळे नाशिक (Nashik) जिल्ह्यात आरोग्य प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर तालुक्यात बरड्याचीवाडी गावची यशोदा आव्हाटे ही महिला प्रसूतीसाठी आली असता अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने आईनेच मुलीची प्रसूती केल्याची लाजिरवाणी बाब उघडकीस आली आहे. ज्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

ही महिला आई आणि आशा वर्कर सोबत अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाली होती. आईच्या मदतीने प्रसूती होताच यशोदा यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. जागतिक महिला दिन दोन दिवसांवर आलेला असतांनाच हा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या घटनेनंतर वैद्यकीय अधिकारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते भगवान मधे यांनी केली आहे. तालुक्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रात अशीच परिस्थिती असून एकही डॉक्टर मुख्यालय राहत नाही. त्यामुळे येत्या 8 मार्च जागतिक महिला दिनी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे मधे यांनी सांगितले. (Latest Marathi News Update)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election : बीएमसीत आमचे वाघ... जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना, निवडणुकीत कुणाला झटका बसणार?

Prarthana Behere: पवित्र रिश्ता फेम प्रार्थना बेहरेविषयी या गोष्टी माहित आहेत का?

SAIL Recruitment: स्टील ऑथोरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी; महिन्याला १.६० लाखांचं पॅकेज; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Maharashtra Live News Update : महिलांच्या खात्यात १०,००० जमा करा- उद्धव ठाकरेंची मागणी

Shubman Gill vs Rohit Sharma : कॅप्टन शुभमन गिलचं विक्रमी शतक; रोहित शर्माच्या वर्चस्वाला सुरुंग

SCROLL FOR NEXT