Nashik Trimbakeshwar Accident Saam Tv
महाराष्ट्र

Accident : त्र्यंबकेशवरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, नियंत्रण सुटलेला पीकअप दुचाकीवर कोसळला अन्...

Nashik Trimbakeshwar Accident News : नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर दर्शनावरून परतणाऱ्या दुचाकीस्वारांवर भरधाव टिपर उलटल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. पोलीस तपास करत असून मृतकांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Alisha Khedekar

  • त्र्यंबकेश्वर मार्गावर दर्शनकरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

  • भरधाव दगडांनी भरलेला टिपर उलटल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू.

  • भीषण अपघाताचा व्हिडिओ CCTV मध्ये कैद

  • त्र्यंबकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मार्गावर दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगात असलेला दगडांनी भरलेला टिपर उलटल्याने दोन पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दुपारी हा भीषण अपघात घडला असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन दुचाकीवरून परतत असताना दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. शिवम राजेश उबेरहांडे आणि भूमिका समाधान खेडेकर अशी मृतांची नावे आहेत. ते MH १५ AY ६५ क्रमांकाच्या दुचाकीवर होते.

त्र्यंबकेश्वर गेस्टहाऊसजवळ उतारावरून येणारा टिपर समोरून चुकीच्या बाजूने येणाऱ्या सिलिंडरने भरलेल्या ‘छोटा हत्ती’ टेम्पोला वाचवण्याच्या प्रयत्नात अचानक ब्रेक लावल्याने उलटला. टिपरमधील दगड दुचाकीस्वारांवर कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या मदतीने टिपर बाजूला करण्यात आला. पंचनामा पूर्ण करण्यात आला असून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : भिवंडी शहरातील कचेरी पाडा परिसरात लाकडाच्या वखाराला भीषण आग

Esakal No.1: मराठी डिजिटल पत्रकारितेत ई-सकाळचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये गाठले पहिल्या क्रमांकाचे स्थान 

Mumbai Shocking : रात्री झोपेतून लघवीसाठी घराबाहेर गेला; तरुण जाळी तुटलेल्या विहिरीत पडला, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saree Reuse Dress: लग्न ते डेली वेअरसाठी; आईच्या जुन्या साडीपासून शिवता येतील या ७ युनिक पॅटर्नचे ट्रेंडी ड्रेसेस

Shocking: नवऱ्याचे गर्लफ्रेंडसोबत शरीरसंबंध, बायकोने नको त्या अवस्थेत पकडलं; व्हिडीओ काढला अन्...

SCROLL FOR NEXT