SHOCKING NASHIK INCIDENT 20 YEAR OLD YOUTH DIES AFTER CONSUMING BATH SOAP Saam Tv
महाराष्ट्र

Shocking : अंघोळीचा साबण खाऊन २० वर्षीय तरुणाचा मृत्यू, नाशिकमध्ये भयंकर घडलं!

Nashik Tragedy News : नाशिकमध्ये २० वर्षीय तरुणाने अंघोळीचा साबण खाल्ल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस तपास सुरू असून शवविच्छेदन अहवालात नेमकं कारण स्पष्ट होईल.

Alisha Khedekar

  • नाशिकमध्ये २० वर्षीय तरुणाचा साबण खाल्ल्याने मृत्यू

  • मृत तरुण ‘स्पेशल चाइल्ड’ असल्याची माहिती

  • पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद; तपास सुरू

  • शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

अभिजित सोनावणे, नाशिक

बिर्याणीनंतर कलिंगड खाऊन मुंबईत चौघांचा मृत्यू झाला असल्याची बातमी ताजी असतानाच, नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका २० वर्षीय मुलाने अंघोळीचा साबण खाल्ला असल्याची माहिती समोर आली आहे. हादरवणारी बाब म्हणजे साबण खाऊन या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने मुलाच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून शवविच्छेदन अहवाल समोर आल्यावर नेमकं कारण स्पष्ट होईल.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अथर्व द्विवेदी असे मृत तरुणाचे नाव आहे. अथर्वने नकळतपणे अंघोळीचा साबण खाल्ल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतर त्याची प्रकृती अचानक बिघडली. कुटुंबीयांनी तत्काळ त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अथर्व हा ‘स्पेशल चाइल्ड’ असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ही घटना अधिकच संवेदनशील ठरत असून, त्याने साबण का खाल्ला? यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी इंदिरा नगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, नेमकी घटना कशी घडली याचा शोध घेतला जात आहे. तसेच, वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, या घटनेमुळे अथर्वच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मुंबईत कलिंगड खाऊन चौघांचा मृत्यू

दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एका कुटुंबातील चार सदस्यांच्या संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली. तपासादरम्यान या चौघांनी मृत्यूपूर्वी बिर्याणी आणि त्यानंतर कलिंगड खाल्ल्याचे समोर आले होते. दरम्यान यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी पोलिसांनी चारही मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले असून संबंधित कुटुंबाबाच्या मृत्यूमागील कारण अद्यापही समोर आलेलं नाही. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया-चेतनसह आणखी एकाचा सहभाग? पोलिसांची संशयाची सुई नेमकी कुणाकडे?

Vijaydurg Fort : शिवरायांनी जिंकलेला सागरी किल्ला! 'विजयदुर्ग' पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जायचा?

Ganesh Murti Price Hike: गणेशभक्तांना महागाईचा फटका, यंदा गणेशमूर्ती २५ ते ३० टक्क्यांनी महागणार, नेमकं कारण काय?

Accident News : प्रवाशांनी खचाखच भरलेल्या २ ST बसची समोरासमोर धडक, भीषण अपघातात ११ विद्यार्थी गंभीर जखमी

Maharashtra Live Update: हिंगोलीत तिकिटाच्या कारणावरून एसटी वाहकाला फायटरने मारहाण

SCROLL FOR NEXT