कोणाची माघार, कोण लढण्यावर ठाम? शिक्षक मतदार संघ निवडणुकीत अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस; राजेंद्र विखेंच्या भूमिकेकडे लक्ष!
MLC Election Mahayuti Nashik Teacher Constituency 
महाराष्ट्र

Nashik News: कोणाची माघार, कोण लढण्यावर ठाम? शिक्षक मतदार संघ निवडणुकीत अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस; राजेंद्र विखेंच्या भूमिकेकडे लक्ष!

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. १२ जून २०२४

लोकसभा निवडणुकानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस असून अपक्ष अर्ज भरलेले राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधु राजेंद्र विखे पाटील यांच्या निर्णयाकडे महायुतीच्या नेत्यांचे लक्ष लागले आहे.

नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस आहे. नाशिक शिक्षक मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि काँग्रेसचे दिलीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. तर भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील, भाजप नेते विवेक कोल्हे आणि भाजपचे पदाधिकारी धनराज विसपुते यांनी भरलेत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांच्या माघारीसाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विखे पाटील काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नाशिक शिक्षक मतदार संघांसाठी महायुतीकडून शिंदेंच्या शिवसेनेचे किशोर दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राजेंद्र विखे पाटील यांनी माघार घेतल्यास महायुतीच्या उमेदवाराला फायदा होणार आहे. त्यामुळे विखे पाटील काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Exam: केंद्र सरकार रिटेस्ट घेण्यास इच्छुक नाही, सिद्धार्थ शिंदे महत्त्वाचं बोलले...

Anant- Radhika Wedding News : राधिका- अनंत अंबानी यांच्या लग्नात सजणार सुरांची मैफल, बॉलिवूडचे दिग्गज गायक करणार लाईव्ह परफॉर्मन्स

Worli Hit And Run Case: हिट अँड रन प्रकरणात पोलिसांना झटका; राजेश शहा यांना जामीन मंजूर

Mumbai Rain Video: मुंबईत ३०० मिलीमीटर एवढा पाऊस, सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर; मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थितीचा आढावा

Jui Gadkari: जुईगडकरीचं सौंदर्य पाहून मन झालं घायाळ

SCROLL FOR NEXT