Wife Killed Husband Saam tv
महाराष्ट्र

Wife Killed Husband : नाशिक हादरलं! बायकोने नवऱ्याचे तुकडे तुकडे केले; गोणीत भरून शोषखड्ड्यात फेकला

Wife Killed Husband in Nashik : नाशिकच्या सुरगणामध्ये पत्नीने पतीची हत्या केली. या घटनेने संपूर्ण नाशिक हादरलं आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे.

Vishal Gangurde

अजय सोनवणे, साम टीव्ही

नाशिक : राजा रघुवंशी हत्या प्रकरण ताज असताना नाशिकमध्ये असाच प्रकार उघडकीस आला आहे. नाशिकमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. नाशिकच्या सुरगणामध्ये बायकोने नवऱ्याला संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बायकोने कुऱ्हाडीने घाव घालत नवऱ्याची हत्या केली. त्यानंतर बायकोने नवऱ्याचे तुकडे केले. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सुरगाणा तालूक्यातील मालगोंदा येथील यशवंत मोहन ठाकरे याची त्याच्या पत्नीने कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केली आहे. हत्येच्या महिन्यानंतर संपूर्ण प्रकार उघडीस आला आहे. यशवंत यांच्या हत्येच्या घटनेने परिसरात एकच भीती पसरली आहे.

प्रकरण कसं उघडकीस आलं?

गेल्या दोन महिन्यांपासून गुजरातमध्ये मजुरीसाठी गेलेला मुलगा परत न आल्याने यशवंत यांच्या आई-वडिलांनी सूनेकडे चौकशी केली. मात्र, सून देखील गुजरातच्या बिलीमोरे येथे निघून गेली. कुटुंबीयांनी मुलगा परत आला नाही, याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाचा काहीच शोध लागला नाही. अखेर यशवंत यांच्या भावाची बायको त्याची पत्नी प्रभाला भेटायला गेली.

यशवंत यांच्या भावाच्या बायकोला घरात काही संशयास्पद गोष्टी दिसून आल्या. तिने ही बाब तिच्या नवऱ्याच्या कानावर घातली. पुढे हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर यशवंत यांचा घरातील शौषखड्ड्यात मृतदेह आढळला. पोलिसांनी गोणीमधील तुकडे केलेले मृतदेह ताब्यात घेतले. या प्रकरणाचा सुरगाणा पोलीस अधिक तपास करीत आहे.

शेतमालावर डल्ला मारणारे दोन संशयित जेरबंद

नाशिक शहरासह जिल्ह्यात शेतीमाल आणि वाहनांची चोरी करणार्‍या दोन संशयितांना ताब्यात घेण्यास म्हसरूळ गुन्हे शोध पथकास यश मिळालं आहे. पोलिसांनी दोन संशयितांकडून सोयाबीन, तांदूळ, गहू आणि महिंद्रा कंपनीच्या तीन पिकअप, हिरो कंपनीची एक दुचाकी, दोन मोबाईल फोन जप्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : महिलांना गरोदर करा आणि १० लाख कमवा, प्रेग्नंट जॉब सर्विसच्या नावाखाली मोठा घोटाळा; नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याने उच्चांक गाठला, १० तोळ्यामागे ११,५०० रुपयांची वाढ, वाचा आजचे भाव

Prabhas : बाईsss काय हा प्रकार! प्रभासच्या चाहत्यांनी थिएटरमध्ये लावली आग, प्रेक्षकांमध्ये उडला गोंधळ, पाहा व्हायरल VIDEO

Maharashtra Live News Update : कांजुरमार्ग पूर्व येथील इमारतीला आग

White Butter Recipe : घरच्या घरी शुद्ध आणि चविष्ट लोणी कसे बनवावे? जाणून घ्या स्टेप्स

SCROLL FOR NEXT