नंदुरबार: नंदुरबारमध्ये निझर रस्त्यावर पोलिसांनी सापळा रचून 35 लाखांच्या गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोन पिकअप गाड्यांना ताब्यात घेतले आहे. नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे विशेष पथक आणि नंदुरबारच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे (Nashik Special Squad Took Action Against Two Vehicle Who Are Transporting Gutkha Of 35 Lakh Rs In Nandurbar nvu92).
या दोन्ही गाडी चालकांना अडवुन गाड्यांतील मालाबद्दल त्यांना विचारणा केली असता चालकांकडून उडवाउडवीची उत्तर मिळताच पोलिसांनी (Police) वाहनाची तपासणी केली. प्रतिबंध असलेला तंबाखु युक्त पान मसाला त्यात आढळून आला. या प्रकरणी तब्बल पाच जणांवर गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला असून चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही पिकअप वाहनांसह एकूण 45 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नंदुरबारच्या (Nandurbar) एका व्यापाऱ्याने गुजरात येथून सदरचा गुटखा (Gutkha) खरेदी करुन धुळे येथे नेला जात असल्याची माहिती पोलीसांनी दिली. विशेष म्हणजे नंदुरबारमार्गे गुजरातमधून रोज कोट्यावधी रुपयांच्या गुटख्यांची राज्यात तस्करी (Smuggling) सुरु असतांना नाशिकच्या आयजीच्या पथकाने कारवाई करेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यातील संबंधित यंत्रणा काय करत आहेत. असा प्रश्न देखील निर्माण होत आहे. या यंत्रनेच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
Edited By - Nupur Uppal
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.