नाशिकमध्ये शिवसेनेने १३ तालुकाप्रमुखांसाठी नव्या कारची व्यवस्था केली
पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी आणि ग्रामीण भागातील संपर्कासाठी उपयोग
आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने १३ कारची खरेदी
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी शिंदे गटाने तयारी सुरू केली आहे. शिवसेनेने ग्रामीण भागातील संघटन मजबूत करण्यासाठी नवी रणनीती आखलीय. यासाठी नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख, आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने नवीन रणनीती आखली असून यातून जिल्ह्यातील १३ तालुकाप्रमुखांना पक्षाच्या कामासाठी नव्या कोऱ्या कार देण्यात येणार आहेत.
या नव्या गाडी पुढारीपणा मिरवण्यासाठी नाहीतर त्याद्वारे गावागावांत पक्षाचा संपर्क वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्या कारच्या मदतीने गावागावात संपर्क वाढवून संघटन मजबूत केलं जाईल, असा विश्वास कांदेंना आहे. जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पक्ष संघटन बळकट करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आलीय. याबाबतचे वृत्त देशदूत या वृत्तसंस्थेनं दिलंय.
विधानसभा आणि महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला पक्षाने वेग दिलाय. त्याचाच भाग म्हणून तालुकाप्रमुखांना पक्षाच्या कामासाठी वाहने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आमदार सुहास कांदे यांच्या पुढाकाराने १३ कार खरेदी करण्यात आल्या आहेत. या कारचा वापर केवळ पक्षाच्या संघटनात्मक कामासाठी करण्याची सूचना तालुकाप्रमुखांना देण्यात येणार आहे.
यासह तालुका प्रमुखांच्या दैनंदिन कामाचा अहवालही घेतला जाणार आहे. पक्षाला वर्षभर निवडणूक मोडमध्ये सक्रिय ठेवण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती आमदार कांदे यांनी दिलीय. तालुकाप्रमुखांना वाहनांची सुविधा मिळाल्यानंतर त्यांच्यावर घरोघरी संपर्क साधण्याची जबाबदारी सोपविली जाणार आहे.
प्रत्येक कारवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची छायाचित्रे लावण्यात येतील. यासह ‘शिवसेना आपल्या दारी’ असा संदेश देण्यात येणार आहे. श्रीकांत शिंदे लंडनहून परतल्यानंतर पुढील आठवड्यात या वाहनांचा लोकार्पण सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.