New Kasara Ghat accident Saam TV
महाराष्ट्र

Kasara Ghat Accident : कसारा घाटात भीषण अपघात, भरधाव कंटेनरची ४ वाहनांना धडक; थरारक VIDEO

New Kasara Ghat accident : नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात भरधाव कंटेनरने ४ वाहनांना जोरदार धडक दिली.

Satish Daud

फैयाज शेख, साम टीव्ही

शहापूर : नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात रविवारी (ता. ६) रात्रीच्या सुमारास चार वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुसाट वेगात असलेल्या कंटेनरने ४ वाहनांना जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, चारही वाहनांचा चक्काचूर झाला. या दुर्घटनेत तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे.

जखमींपैकी तिघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी कसारा येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. मागील काही दिवसांपासून नवीन कसारा घाटात सातत्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. अवघड वळणे असल्याने घाटात ट्रक, कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटून मोठ मोठे अपघात होत आहेत.

रविवारी रात्रीच्या सुमारास नवीन कसारा घाटात पुन्हा विचित्र अपघात झाला. नाशिकहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरचा अचानक ब्रेक फेल झाल्याने कंटेनरने ४ वाहनांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनर चालक आणि कारमधील एक लहान मुलगा वाहनांच्या मध्यभागी अडकून पडले होते.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल १ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जखमींना बाहेर काढण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर घाटात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. ही कोंडी सोडवताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली.

माळशिरस जवळील अपघातात ४ जणांचा मृत्यू

माळशिरस तालुक्यातील कारूंडे गावाजवळ कार आणि टेम्पोचा समोसमोर भीषण अपघात झाला. यामध्ये चार‌ जणांचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. अपघातील मृत व्यक्ती हे इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील कामगार होते. सर्वजण कास पठार पाहण्यासाठी कारने साताऱ्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी समोरून सुसाट वेगात येणाऱ्या टेम्पोने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: अमावस्येच्या मध्यरात्री नग्न होऊन खोदायचा कबरी; महिलांचे मृतदेह बाहेर काढून भयंकर कृत्य; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: रामदास आठवले यांनी पैठण तालुक्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Navratri Remedies: नवरात्रीत सुपारीच्या पानांचा करा खास उपाय, मिळेल नोकरी व व्यवसायात यश

Today Gold Rate: नवरात्रीत सोन्याला पुन्हा झळाली; १० तोळ्यामागे ३००० रुपयांची वाढ; वाचा आजचे दर

Bigg Boss 19: नेहलची री-एन्ट्री, तान्याची पोलखोल, फरहाना - गौरवची कॅप्टनशिपसाठी भांडण; काय घडलं बिग बॉसच्या घरात

SCROLL FOR NEXT