Manoj Jarange Shantata Rally : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे राज्यभर शांतता रॅली काढत आहेत. त्यांच्या शांतता रॅलीचा मंगळवारी (१३ ऑगस्ट) नाशिकमध्ये समारोप होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याशिवाय शहरातील वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आले आहे.
मनोज जरांगे यांच्या शांतता रॅली आणि सभेच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या रॅली आणि सभेला मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव येण्याची शक्यता असल्याने शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेय.
नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. त्यासाठी मराठा आंदोलकांनी जोरदार तयारी केली. नाशिमधीलसीबीएस येथे मनोज जरांगे पाटलांची जंगी सभा होणार आहे.
शांतता रॅलीच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असणार आहे. रॅली मार्गावर वाहतूक सकाळपासून बंद ठेवून पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे. सीबीएस चौकात मंडप उभारण्याचं काम पूर्ण झालं आहे. नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील उद्या नेमकं काय बोलणार? छगन भुजबळ यांच्यावर टीका करणार काय़ याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामधील वाहतूक मार्गात मोठे बदल करण्यात आले आहे. स्वामी नारायण चौकापासून ते कन्नमवार पूल, मिर्ची सिग्नल ते स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉइंट ते दिंडोरी नाका, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा ते सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल ते सीबीएसच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.