महाराष्ट्र

Dindori Road Accident : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव जीप झाडाला आदळली; ५ ते ६ जण दगावल्याची शक्यता

Dindori Road Accident update : नाशिकमधून अपघाताची दुर्देवी घटना समोर आली आहे. आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी तालुक्यत भरधाव वाहन झाडावर आदळून अपघाताची घटना घडली.

Vishal Gangurde

तबरेज शेख, नाशिक

Nashik Accident :

नाशिकमधून अपघाताची दुर्देवी घटना समोर आली आहे. आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात भरधाव वाहन झाडावर आदळून अपघाताची घटना घडली. दिंडोरी रोडवर ढकांबेगावाजवळ ही अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ५ ते ६ जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमध्ये भरधाव जीप झाडाला आदळून अपघात झाल्याची घटना घडली. नाशिकच्या दिंडोरी रोडजवळ ढकांबेगावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली. या भीषण अपघातात ५ ते ६ जण ठार असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या भीषण अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली. त्यानंतर लोकांची मदतीसाठी एकच धावाधाव झाली. स्थानिकांनी तातडीने अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी अपघातग्रस्त मृत झाल्याचे घोषित केले. या भीषण अपघाताने मृतांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

टायर फुटल्याने अपघात झाल्याचा प्राथिमक अंदाज

नाशिकमधील या भीषण अपघातात जीपचा चक्काचूर झाला आहे. दुचाकी आणि जीपची एकमेकांना धडक झाल्याने भीषण अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. या अपघाताची माहिती मिळताच दिंडोरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर पोलीस आणि स्थानिकांनी एकत्र मदतकार्य केलं. या अपघातामधील जखमींना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अल्पवयीन तरुणांची धिंड काढणे पुणे पोलिसांना भोवले; १७ पोलिसांविरोधात गुन्हा दाखल

Mumbai News: बायकोच्या अनैतिक संबंधावरून वाद, कामावर गेलेला सीए घरी परत आलाच नाही; मुंबईत खळबळ

Tomato Kidney Stones: टोमॅटो किंवा त्याच्या बिया खाल्ल्याने किडनी स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

Lord Ganesha dream meaning: विसर्जनानंतर स्वप्नात गणपती बाप्पा दिसतोय का? काय असतो याचा अर्थ, मिळतात हे संकेत

Accident News : मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात! कारची ट्रेलरला जोरदार धडक; मंत्र्याच्या मुलीसह ४ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT