Tomato Kidney Stones: टोमॅटो किंवा त्याच्या बिया खाल्ल्याने किडनी स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलं खरं कारण

Shruti Vilas Kadam

टोमॅटोबाबत अनेक गैरसमज

टोमॅटो आणि विशेषतः त्याच्या बिया खाल्ल्याने किडनी स्टोन होतो, असा समज अनेकांमध्ये आहे. मात्र याबाबत नेमके तथ्य समजून घेणे महत्त्वाचे आहे.

Tomato | yandex

टोमॅटोमध्ये ऑक्सलेट असते

टोमॅटोमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण असते. ऑक्सलेट आणि कॅल्शियम एकत्र आल्यास काही लोकांमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट प्रकारचे किडनी स्टोन तयार होऊ शकतात.

Tomato | yandex

बिया हे मुख्य कारण नाही

केवळ टोमॅटोच्या बिया खाल्ल्यामुळे किडनी स्टोन होतो, असे थेट म्हणता येत नाही. स्टोन होण्यामागे अनेक आहारविषयक आणि शारीरिक घटक कारणीभूत असतात.

Tomato | GOOGLE

पाणी कमी पिणे ठरू शकते कारण

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास लघवी अधिक घट्ट होते. त्यामुळे लघवीतील काही खनिजे एकत्र येऊन स्टोन तयार होण्याचा धोका वाढू शकतो.

tomato | pinterest

प्रमाणात टोमॅटो खाणे महत्त्वाचे

निरोगी व्यक्तीने संतुलित आहाराचा भाग म्हणून योग्य प्रमाणात टोमॅटो खाल्ल्यास तो किडनी स्टोनचे कारण ठरत नाही.

tomato | pinterest

ज्यांना आधी स्टोन झाला आहे त्यांनी काळजी घ्यावी

किडनी स्टोनचा पूर्वीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी आहाराबाबत डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. प्रत्येक व्यक्तीसाठी आहारातील निर्बंध सारखे नसतात.

Tomato | yandex

फक्त एका पदार्थाला दोष देऊ नका

किडनी स्टोनचा धोका होऊ नये म्हणून ४ लिटर पाणी पिणे, आहारातील मीठ कमी खाणे, कॅल्शियम भरपूर पदार्थ आवश्यक तितकेच खाणे गरजेचे असते.

Tomato

ShahRukh Khan: शाहरुख खान ठरला भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेता; किंग खानची संपत्ती पाहून व्हाल थक्क!

ShahRukh Khan | Saam Tv
येथे क्लिक करा