PM Modi In Nashik  Saam Tv
महाराष्ट्र

PM Modi Rally: महायुतीच्या प्रचारसभेत तरुण शेतकरी आक्रमक; कांद्यावर बोला शेतकऱ्यांच्या घोषणा

PM Modi In Nashik : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचाराने वेग धरलाय. आज पंतप्रधान मोदींनी डॉ. भारती पवार आणि हेमंत गोडसेंच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी मोदींना कांदा उत्पादकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

Bharat Jadhav

नाशिक: भाजप आणि पंतप्रधान मोदींवर राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कमालीचा नाराज झालेला दिसत आहे. शेतकऱ्याच्या नाराजीचा प्रत्यय नाशिकमधील सभेत दिसला. दरम्यान शेतकऱ्यांच्या या नाराजीचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे. नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींनी नाशिकमधील पिंपळगावमध्ये सभा घेतली. या सभेत शेतकऱ्यांनी कांद्या प्रश्नावर बोला, अशा घोषणा दिल्या. त्यानंतर तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या शेतकऱ्याला सभा मंडपातून बाहेर काढलं.

नाशिकमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेत कोणताच गोंधळ होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली होती. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणि शेतकरी आंदोलकांना नोटिसा पाठवल्या तर तर काही जणांची धरपकड देखील करण्यात आली होती. तरीही नाराज असलेल्या शेतकऱ्यांनी ऐन भाषणावेळी कांदा प्रश्नावर बोला, अशा घोषणा दिल्या. शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करताच तेथील भाजप कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी नावाच्या घोषणा सुरू केल्या. यासर्व गोंधळात पोलीस कर्मचाऱ्यांना त्या शेतकऱ्याला सभा मंडपातून बाहेर काढले.

मोदींचं सर्व लक्ष शेतकऱ्यांना सशक्तीकरणकडे आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी माझा १० वर्षाचं काम पाहिलं आहे. शेतकरी वर्गाने याआधी काँग्रेस आणि राष्ट्रावादीचा कार्यकाळ पाहिला आहे. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांचा विचार केला जात नव्हता. आधीच्या सरकारच्या काळात एकही पैसा मिळत नव्हता.शेतकऱ्यांना खोटे पॅकेजची घोषणा केली जात होती. नाशिकमध्ये कांदा आणि द्राक्षांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं.आमच्या सरकारने पहिले आहे, ज्यांना पहिल्यांदा कांद्याचे बफर्स तयार केलं. आधीच्या सरकारमध्ये अशी कोणती योजना नव्हती. मागील हंगामात सात लाख मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांकडून खरेदी केला. त्यानंतरही सरकार ५ लाख कांद्याचे बफर्स तयार (साठा) करू लागले.

भाजप आणि एनडीएच्या कार्यकाळात कांद्याची निर्यातीत ३५ टक्क्यांनी वाढले आहे.मागील दहा दिवसांपूर्वी कांद्यावरील निर्यात बंदी उठवली. या काळात २२ हजार मेट्रिक टनपेक्षा जास्त कांद्याची निर्यात करण्यात आलीय.सरकार ऑपरेशन ग्रीनच्या अंतर्गत कांद्याच्या निर्यातीवर अनुदानदेखील देणार असल्याचं मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT