Nashik Rain Update साम टीव्ही एआय
महाराष्ट्र

Nashik Rain Update : पुढील ४८ तास धोक्याचे! शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर; नाशिक आयुक्तांचे कडक आदेश

Nashik Rain School close : नाशिकमध्ये पुढील ४८ तास अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी उद्या नाशिक महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या (Heavy Rain Alert) इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन नाशिक शहरातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी याबाबतचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. पावसाचा जोर आणि संभाव्य पूरस्थिती पाहता पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पुढील ४८ तासांत नाशिकमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हाच धोका ओळखून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे. महापालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व माध्यमांच्या (मराठी, इंग्रजी, हिंदी इ.) आणि सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांना ही सुट्टी लागू असणार आहे, असे पालिका आयुक्तांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आळंदी मुख्य मंदिराच्या दिशेने जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद

Skin Care: त्वचा राहील तरुण आणि चमकदार! आहारात करा या या ५ भाज्यांचा समावेश

Egg : दररोज अंडी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो? लगेचच वाचा महत्त्वाची माहिती

लोहगड हत्याकांडात नवा ट्विस्ट! केतनचा काटा काढण्याआधी सियाने काय शोधलं? भयानक गुगल सर्चने पोलिसांची झोप उडवली

मुंबईच्या समुद्रात मोठी भरती, नाशिकमध्ये ढगफुटी; दोन दिवस नागरिकांनो घराबाहेर पडू नका, CM फडणवीसांचे आवाहन

SCROLL FOR NEXT