Nashik Guardian Minister  saam tv
महाराष्ट्र

Nashik Guardian Minister: पालकमंत्रिपदाच्या वादात मुख्यमंत्र्यांनी काढला 'सुवर्णमध्य',पण फडणवीसांच्या वक्तव्याने नवी चर्चा सुरू

Nashik Guardian Minister : नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. यावेळी त्यांनी नाशिकच्या पालकमंत्रिबाबत मोठं वक्तव्य केलंय.

Bharat Jadhav

नाशिक आणि रायगड जिल्हाच्या पालकमंत्रिपदावरून महायुती वाद आहे. नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र शिंदे गटाने त्याला विरोध केला. नाशिकमध्ये देखील मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. पालकमंत्रिपदावर महायुतीत वाद उफाळून आल्याने नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली.

या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अजूनही कायम आहे. दरम्यान नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडेच राहणार असल्याची चर्चा आहे. याचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या पालकमंत्रिबाबाबत मोठं विधान केलंय. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावर होते. यावेळी फडणवीसांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

त्यानंतर कुशावर्त तीर्थ परिसराची पाहणी केली. नाशिकमध्ये आणि त्र्यंबकेश्वर येथे 2027 साली होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा फडणवीसांनी घेतला. आढावा घेतल्यानंतर फडणवीसांनी नाशिक शहरातील युवा उद्योजकांसोबत चर्चा सत्रात सहभाग घेतला. या चर्चासत्रात त्यांनी नाशिक पालकमंत्रिदावरून मोठं विधान केलं.

यावेळी देवेंद्र फडणवीसांना युवा उद्योजकांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या तिढ्याबाबत प्रश्न केला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्रीबाबत मोठं विधान केलं. जोपर्यंत जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर होत नाही, तोपर्यंत त्याचा चार्ज मुख्यमंत्र्यांकडे असतो. पण लवकरच पालकमंत्री जाहीर करू, असं विधान फडणवीस यांनी केले. त्यामुळे आता महायुतीच्या तिढ्यात सुवर्णमध्य काढला. मात्र नाशिकचा पालकमंत्री मुख्यमंत्री फडणवीसच ठेवणार का? अशी राजकीय वर्तुळात रंगत आहे.

मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी संवाद साधला, उत्तर प्रदेशने ज्याप्रकारे या कुंभमेळ्याचा कायदा तयार केला. कुंभमेळा प्राधिकरण तयार केलं. त्याच धर्तीवर आपणही कायदा तयार करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. कुंभमेळा प्राधिकरण तयार करून त्याला कायदेशीर चौकट देत असल्याचं फडणवीस म्हणाले. याबाबतचं वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने दिले आहे.

नाशिकच्या पालकमंत्री म्हणून भाजप नेते गिरीश महाजन यांची निवड करण्यात आली. मात्र त्या पदावर शिवसेना शिंदे गटाचे नेते दादा भुसेंनी दावा केलाय. तर नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आमदार राष्ट्रवादीचे आहेत, त्यामुळे अजित पवार गटानेही नाशिकच्या पालकमंत्रिपदावर दावा केला आहे. त्यामुळे महायुती वाद सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Maharashtra News Live Update: सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

SCROLL FOR NEXT