Major Setback for BJP in Nashik Saam Tv
महाराष्ट्र

ठाकरे गटाला दिवाळीत बंपर लॉटरी! भाजपमधील महिला नेता शिवसेनेच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Major Setback for BJP in Nashik: नाशिकमधील भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील. भाजपला मोठा धक्का.

Bhagyashree Kamble

  • नाशिकमध्ये भाजपला धक्का.

  • माजी नगरसेवक संगीता गायकवाड भाजपच्या वाटेवर.

  • गायकवाडांच्या प्रवेशामुळे ठाकरे गटाची ताकद वाढणार.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये इनकमिंग सुरूच आहे. मात्र, नाशिकमध्ये राजकीयदृष्ट्या उलटे वारे वाहू लागले आहेत. भाजपचे माजी नगरसेवक यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते नाराज असल्याची चर्चा होती. लवकरच भाजपला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती होती. मात्र, आता त्यांनी भाजपला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असून, लवकरच माजी नगरसेवक शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.

भाजपच्या माजी नगरसेवक संगीता गायकवाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात माजी नगरसेवकांचा महायुतीच्या पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा कल वाढत चालला आहे. मात्र, संगीता गायकवाड यांनी महायुतीमधून थेट महाआघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून संगीता गायकवाड भाजपला जय महाराष्ट्र करणार असल्याची चर्चा होती. या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. संगीता गायकवाड यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. संगीता गायकवाड यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाकरेंच्या सेनेत प्रवेश करणार आहे.

नाशिकमधून शक्तीप्रदर्शन करत संगीता गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते मातोश्रीच्या दिशेनं रवाना झाले आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर संगीता गायकवाड हाती शिवबंधन बांधून घेतील. गायकवाड यांच्या पक्षप्रवेशामुळे ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद वाढली असून, नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: दोंडाईचामध्ये महाविकास आघाडीला मोठा धक्का, माजी नगरसेवकाचा भाजपमध्ये प्रवेश

Fact Check: बिबट्यांच्या जुन्नरमध्ये वाघाचा धुमाकूळ? वस्त्यांमध्ये फिरतोय आता पट्टेरी वाघ?

Ladki Bahin Yojana: e-KYC मधला पहिला मोठा अडथळा दूर; लाडक्या बहिणींची चिंता मिटली, वेबसाईटमध्ये बदल

ड्रग्ज तस्करीतील आरोपी भाजपात, राजकारणात संतोषचा 'परमेश्वर' कोण?

Bihar Election Exit Poll: बिहारमध्ये महाआघाडी की NDA? कुणाचं सरकार येणार? Today's Chanakya चा एक्झिट पोल आला...

SCROLL FOR NEXT