Nashik news  Saam tv
महाराष्ट्र

Nashik : भाईचा बड्डे, वाजले की बारा; पोलिसांच्या दणक्यानंतर भाईगिरी उतरली अन् हात जोडून माफी मागितली

Nashik News : नाशिक पोलिसांच्या दणक्यानंतर तरुणांची सोशल मीडियावरील भाईगिरी उतरली. पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर तरुणांनी हात जोडून माफी मागितली.

Vishal Gangurde

नाशिक : शहर असो किंवा ग्रामीण भाग आता रस्त्यावर रात्री-अपरात्री बर्थडे सेलिब्रेशन करण्याचे प्रकार आता सर्रास सुरु झाले आहे. काही मराठी, हिंदी सिनेमातील रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याची पद्धत लोकप्रिय होऊ लागली आहे. अशाच वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरी करण्याची पद्धतीची क्रेझ तरुणांमध्ये होऊ लागली आहे. यामुळे भररस्त्यात तलवारीने केक कापणाऱ्या आणि गोंधळ घालणाऱ्या तरुणांची टोळक्यांची संख्या वाढू लागली आहे. काही तरुण वाढदिवसाच्या सोशल मीडियावर धारदार शस्त्र दाखवत रील्स तयार करु लागले आहेत. अशाच पद्धतीने वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्यांची पोलिसांनी चांगलीच भाईगिरी उतरवली आहे. यानंतर या टोळक्यांनी हात जोडून माफी देखील मागितली आहे.

सोशल मीडियाचा वापर करून तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करण्याची पद्धत काही कथित भाईंमध्ये रुढ होऊ लागली आहे. सोशल मीडियावरून अनेकांचे वाढदिवस लगेच समजतात. त्यानंतर अशा कथित भाईसाठी वेगवेगळे रील्स तयार केले जातात. असं फॅड तरुणांमध्ये वाढू लागलं आहे. यासाठी प्रत्येकाची अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याची स्पर्धा तरुणांमध्ये वाढू लागली आहे. अशाच पद्धतीने वाढदिवस साजरा करणाऱ्या कथित भाईला नाशिक पोलिसांनी चांगलाच खाक्या दाखवला आहे.

नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावर धारधार शस्त्र दाखवत बर्थडे सेलिब्रेशन करणाऱ्या एका कथित भाईसह त्याच्या मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलं. गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. भाईला ताब्यात घेत पथकाने खाक्या दाखवताच ज्या अकाउंटवर रील्स पोस्ट शेअर केली, त्याच अकाउंटवर भाईने माफी मागत यापुढे अशी रील्स बनवणार नसल्याची लेखी हमी देत पोलिसांची माफी मागितली.

सोशल मीडियावर एका अकाउंटवर बसक्या डॉन नावाच्या कथित भाईने तलवारीने केक कापल्याची रिल्स व्हायरल झाली. सायबर पेट्रोलिंगमध्ये ही रिल्स दिसून आली. याची दखल घेत गुंडा विरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी संशयित भाईचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखवताच त्याने सोशल मीडियावर माफी मागत यापुढे कधीच अशा रिल्स बनवणार नसल्याची लेखी हमी दिली.

आता संशयितावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली. सोशल मीडियावर वादग्रस्त रील्स, पोस्टवर सायबर पेट्रोलिंग द्वारे नजर ठेवली जात आहे. या माध्यमातून अशा वादग्रस्त रील्स व्हायरल करणे, लाईक-कमेंट करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : महायुतीच्या सत्ता स्थापनेचा निर्णय लांबणार? मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला काय ठरला? पाहा व्हिडिओ

Ekanth Shinde : एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदी निवड; पक्षाच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर

Maharashtra Politics: निवडणुकीतील यशाने ब्रँडवर शिक्कामोर्तब! ठाकरे, पवारांनंतर आता शिंदेशाही

Maharashtra Politics: घड्याळाची तुतारीवर मात! दादांची राष्ट्रवादी पवारांवर वरचढ

Pune Politics : पुण्यात काँग्रेसचा सुपडासाफ; जिल्ह्याची सुभेदारी महायुतीकडे का गेली? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT